AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुळशीशिवाय अपूर्ण असते भगवान विष्णूची पूजा; जाणून घ्या तुळशीच्या रोपामुळे घरात सुख कसे नांदते?

तुळशीची वनस्पती भगवान विष्णूशी संबंधित असल्याने तिची पवित्रता कायम जपा. तुळशीच्या रोपाभोवती नियमित स्वच्छता करा आणि त्याच्या पुढे चप्पल-शूज वगैरे ठेवू नका.

तुळशीशिवाय अपूर्ण असते भगवान विष्णूची पूजा; जाणून घ्या तुळशीच्या रोपामुळे घरात सुख कसे नांदते?
तुळशीशिवाय अपूर्ण असते भगवान विष्णूची पूजा
| Edited By: | Updated on: Aug 05, 2021 | 7:48 AM
Share

नवी दिल्ली : सनातन परंपरेत तुळशीची वनस्पती अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानली जाते. भगवान विष्णूची उपासना तुळशीच्या भोगाशिवाय अपूर्ण मानली जाते. तुळशीला विष्णुप्रिया म्हणतात. असे मानले जाते की तुळशीच्या रोपामुळे तुमच्या घरातील सर्व दोष दूर होतात. पवित्रता आणि देवत्व असलेली ही वनस्पती प्रत्येक हिंदू कुटुंबियांच्या घराच्या अंगण, बाल्कनी आणि दारावर लावण्यात आलेली असते. दररोज तुळशीची पूजा केली जाते. घरातून बाहेर पडताना पहिल्यांदा आपल्या नजरेमध्ये तुळस दिसली की नक्कीच आपले कुठलेही काम यशस्वी होते. (Worship of Lord Vishnu is incomplete without Tulsi; know how this plant brings happiness in the house)

1. ज्या घरात तुळशीचे रोप असते, तिथे नेहमी पवित्रता राहते तसेच वातावरणातील नकारात्मकता दूर होते.

2. तुळशीचे पवित्र रोपटे घराच्या ईशान्य दिशेला ठेवावे. घराच्या या दिशेला तुळशीचा रोप लावल्याने संपत्ती आणि ऐश्वर्य वाढते.

3. भगवान विष्णूसह देवी लक्ष्मीचे आशीर्वाद मिळवण्यासाठी दररोज तुळशीच्या रोपासमोर संध्याकाळी शुद्ध तुपाचा दिवा लावा.

4. जी व्यक्ती प्रत्येक दिवशी तुळशी प्रसादाचे सेवन करते, त्या व्यक्तीवर श्री हरीची कृपा होते. दरदिवशी दही आणि साखरेसोबत तुळशीच्या पानांचे सेवन करणे अत्यंत शुभ मानले जाते.

5. मंगळवार, रविवार, एकादशी आणि सूर्यग्रहणांच्या वेळी तुळशीच्या रोपाला स्पर्श करू नये. तसेच या दिवशी तुळशीचे रोप लावू नका किंवा त्याची पाने तोडू नका.

6. तुळशीची वनस्पती भगवान विष्णूशी संबंधित असल्याने तिची पवित्रता कायम जपा. तुळशीच्या रोपाभोवती नियमित स्वच्छता करा आणि त्याच्या पुढे चप्पल-शूज वगैरे ठेवू नका.

7. तुळशीचे रोपटे तुमच्या घरात येणाऱ्या संकटाचे संकेत देते. असे म्हटले जाते की जेव्हा तुमच्या घरात ठेवलेली तुळशीची वनस्पती सुकू लागते, तेव्हा समजून जा की तुमच्या आयुष्यात काहीतरी संकट येणार आहे. अशा परिस्थितीत ताबडतोब ती वनस्पती काढून टाका आणि तेथे हिरव्या आणि निरोगी तुळशीचे रोप लावा.

8. तुळशीचे सुकलेले झाड कधीही कचऱ्यात फेकून देऊ नका, तर ते जमिनीच्या अंतर्भागात दाबा किंवा कोणत्याही पवित्र नदीत सोडून द्या. (Worship of Lord Vishnu is incomplete without Tulsi; know how this plant brings happiness in the house)

इतर बातम्या

‘माझ्या मालकीची जागा मला परत द्या,’ ठाण्यात 77 वर्षाच्या आजीचे बेमुदत आमरण उपोषण

भंडाऱ्यात आरोग्य शिबिरादरम्यान चक्क कालबाह्य औषधांचे वितरण, आसगाव येथील धक्कादायक प्रकार

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.