
2026 वर्ष सुरू होण्यासाठी काही दिवस बाकीच बाकी आहेत. ज्योतिषांच्या मते 2026 मध्ये अनेक शुभ आणि अशुभ योग तयार होतील. त्यापैकी एक म्हणजे ग्रहण योग आहे. ज्योतिषशास्त्रात हा योग खूप अशुभ आणि धोकादायक मानला जातो. जेव्हा सूर्य किंवा चंद्र राहू किंवा केतूच्या एकाच राशीत असतात किंवा एकमेकांच्या खूप जवळ येतात तेव्हा ग्रहण योग तयार होतो.
2026 मध्ये राहू आणि सूर्य मिळून हा अशुभ योग निर्माण होईल. दृक पंचांगानुसार, 2026 मध्ये ग्रहांचा राजा सूर्य, शनीच्या कुंभ राशीत प्रवेश करेल, जिथे राहू आधीच उपस्थित असल्याने ग्रहण योग निर्माण होणार आहे. 13 फेब्रुवारी 2026 रोजी सूर्य कुंभ राशीत प्रवेश करेल. त्यावेळी हे दोन्ही ग्रह एक युती करतील, जी 15 मार्च 2026 पर्यंत राहील. ग्रहण योगाची निर्मिती अनेक राशींच्या लोकांच्या जीवनात अडचणी आणू शकते. या तिन्ही राशींच्या लोकांना ग्रहण योगाबद्दल अत्यंत सावधगिरी बाळगावी लागेल. चला तर मग कोणत्या आहेत त्या तीन राशी ते जाणून घेऊयात.
2026 मध्ये ग्रहण सुरू झाल्यामुळे मीन राशीवर संकटांचा डोंगर कोसळू शकतो. मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप कठीण असेल. या काळात मीन राशीच्या लोकांना आर्थिकदृष्ट्या सावधगिरी बाळगावी लागेल. नवीन प्रकल्प किंवा व्यवसायात नुकसान होऊ शकते. कामाच्या ठिकाणी पदोन्नतीला विलंब होऊ शकतो.
2026 मध्ये येणाऱ्या ग्रहणांमुळे कन्या राशीच्या लोकांच्या आर्थिक परिस्थितीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिकदृष्ट्या आव्हानात्मक असेल. मोठे निर्णय घेतल्यास नुकसान होऊ शकते. नवीन नोकरीच्या संधी फायदेशीर नसणार. तसेच आरोग्य देखील बिघडू शकते.
2026 मध्ये होणाऱ्या ग्रहणांमुळे कर्क राशीच्या लोकांना आर्थिक अस्थिरतेचा सामना करावा लागू शकतो. गुंतवणूक आणि व्यवसायात जोखीम वाढू शकते. अचानक मोठे खर्च येऊ शकतात. जुने कर्ज तुमच्यावर दबाव आणू शकतात.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)