Rajyog Numerology: ‘या’ तारखेला जन्मलेल्यांच्या नशिबात असतो राजयोग; माता-पित्यांचेही चमकते नशीब!

9 मूलांक असलेले कुशाग्र बुद्धीचे असतात. जरी त्यांची शैक्षणिक पात्रता कमी असली तरी त्यांना व्यावहारिक ज्ञान उत्तम असते.

Rajyog Numerology: 'या' तारखेला जन्मलेल्यांच्या नशिबात असतो राजयोग; माता-पित्यांचेही चमकते नशीब!
Follow us
| Updated on: Jun 04, 2022 | 5:54 PM

काही जण जन्मताच भाग्यवान असतात. त्यांच्या जन्मानंतर घरात सुख-समृद्धी येऊ लागते. अंकशास्त्रामध्ये  (Numrology) अशा 3 तारखा सांगितल्या आहेत ज्यामध्ये जन्मतःच हे लोकं राजयोग (Rajyog) घेऊन येत असतात. आपण येथे 9 या मूलांकाबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यांची जन्मतारीख 9, 18 आणि 27 आहे, त्यांचा मूलांक 9 आहे. या मूलांकाला जन्मलेले भाग्यवान मानले जातात. ते राजयोग घेऊनच जन्माला आलेले असतात. या मूलांकावर जन्मलेले उत्साही आणि धैर्यवान असतात. त्यांच्यात आत्मविश्वासाची कमतरता नसते. आपल्या कामाप्रती आणि माता-पित्यांप्रती ते समर्पित असतात. दृढनिश्चयी असल्याने ते आयुष्यात प्रत्येक गोष्ट सध्या करतात. त्यांच्याकडे जमीन आणि मालमत्तेची कमतरता नसते. या मूलांकातील अनेक लोकांकडे भरपूर संपत्ती असते. तसेच शेतीमध्ये यांना विशेष रुची असते.  हे लोक कृषी उत्पादनांमधून खूप चांगला नफा कमवू शकतात.

  1. मूलांक 9 असलेले मुलं त्यांच्या आई-वडिलांसाठी खूप भाग्यवान मानले जातात. त्याच्या जन्मानंतर त्यांच्या माता-पित्यांचेही नशीब चमकते, असे म्हणतात. त्यांच्या नशिबात राजयोग लिहिलेला असतो. योग्य वेळी त्यांना  करिअरचे मार्गदर्शन मिळाले तर कमी कालावधीत ते मोठे यश मिळवू शकतात. हे लोकं नोकरीत उच्च पदांवर कार्यरत असतात. तसेच, ते व्यवसायातही त्यांचा चांगला जम बसतो. जोखमीचे काम करण्यातही ते पटाईत असतात.
  2. 9,18 आणि 27 तारखेला जन्मलेल्यांना सहसा आर्थिक तंगीचा सामना करावा लागत नाही. आयुष्यात कधी आर्थिक संकटं आली तरी ते त्यातून मार्ग काढण्यास यशस्वी ठरतात. 9 मूलांक असलेले कुशाग्र बुद्धीचे असतात. जरी त्यांची शैक्षणिक पात्रता कमी असली तरी त्यांना व्यावहारिक ज्ञान उत्तम असते. यांच्या जिभेवर जणू सरस्वतीच असते. बोलण्यात मधुरता असते, त्यामुळे इतर लोकं दुखावल्या जात नाही. तसेच त्यांचे हितशत्रुही तयार होत नाही. मिळालेल्या संधीचे सोने करणे त्यांना चांगले जमते. त्यांच्यात प्रामाणिकपणा असल्याने जबाबदारीची कामे सोपविली जातात. उत्तम नेतृत्त्व गुण असल्याने ते कामाच्या ठिकाणी कमी कालावधीत जास्त प्रगती करतात.
  3. हे सुद्धा वाचा
  4. 9,18,27 या तारखेला जन्मलेले आपल्या आई-वडिलांना दुखावत नाही. जन्मदात्याबद्दल त्यांच्या मनात कायमच कृतज्ञतेचा भाव असतो. 9 उलानक असलेली मुलं त्यांच्या आई-वडिलांसाठी हिऱ्यापेक्षा कमी नसतात. समाजातसुद्धा या लोकांना मान-सम्मान मिळतो. यांना सामाजिक कार्याचीही आवड असते. कुठल्याही लाभाची अपेक्षा न ठेवता ते समाप्रती त्यांचे असलेले कर्तव्य पूर्ण करतात. अनेकांना त्यांच्या कर्तृत्वाचा हेवा वाटतो.

(वरील माहिती अंकशास्त्राच्या मान्यतेनुसार देण्यात आलेली आहे. याचा अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये)

Non Stop LIVE Update
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.