Raksha Bandhan 2024: ‘एक हजारों में मेरी बहना है’, रक्षाबंधनच्या निमित्ताने भावा-बहिणींना पाठवा शुभेच्छा संदेश, वाढेल नात्यातला गोडवा !
Raksha Bandhan 2024 : यावेळी राखी पौर्णिमा अर्थात रक्षाबंधन 19 ऑगस्ट रोजी येत आहे. रक्षाबंधनाचा हा दिवस भाऊ आणि बहीण दोघांसाठी खूप खास असतो. या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते, त्याला मिठाई भरवते. आणि भाऊ बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो. या विशेष प्रसंगी, तुम्ही तुमच्या प्रियजनांना शुभेच्छा देखील पाठवू शकता.

रक्षाबंधन अर्थात राखीचा हा सण भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाचे प्रतीक मानला जातो. दरवर्षी हा रक्षाबंधनाचा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. या दिवशी बहिणी आपल्या भावांना राखी बांधते. त्याला मिठाई भरवते आणि भाऊ आपल्या बहिणीचे आयुष्यभर रक्षण करण्याचे वचन देतो. खरे तर राखीचा सण खूप जुना आहे. पौराणिक कथेनुसार या सणाचा इतिहास महाभारत काळाशी जोडलेला आहे. महाभारत काळात श्रीकृष्णाचे बोट सुदर्शन चक्राने कापले गेले. तेव्हा द्रौपदीने आपली चिंधी फाडून भगवान श्रीकृष्णाच्या बोटावर बांधली. त्याच दिवशी देवाने द्रौपदीचे रक्षण करण्याचे वचन दिले होते. रक्षाबंधनाच्या सणाला शास्त्रांमध्ये खूप विशेष महत्त्व असते.
जे भाऊ-बहीण एकत्र राहतात, बहिणी-भाऊंना आभासी जगाची मदत घ्यावी लागत नाही. पण दूरवर राहणारे बंधू-भगिनी एकमेकांना व्हर्च्युअल शुभेच्छा पाठवू शकतात. रक्षाबंधनाच्या या खास दिवशी तुम्ही तुमच्या बहीण-भावांना हे खास शुभेच्छा संदेश पाठवू शकता आणि नात्याचा गोडवा वाढवू शकता.
- भावा-बहिणीचे नाते सदैव प्रेमाने आणि सुरक्षिततेने भरलेले राहो हीच रक्षाबंधनाच्या या पवित्र सणानिमित्त ईश्वरचरणी प्रार्थना.
- माझ्या प्रिय बहिणी, आयुष्यभर सोबत रहा. रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.
- हे बंध स्नेहाचे, हे बंध रक्षणाचे,रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
- भाऊ आणि बहिणीच्या अखंड प्रेमाचा साक्षीदार असणाऱ्या रक्षाबंधन सणामनिमित्त हार्दिक शुभेच्छा!
- भावा-बहिणीचे हे अखंड प्रेम कधीच कमी न होवो. राखीच्या शुभेच्छा !
- हे बंध प्रेमाचे, हे बंध नात्यांचे, असाच टिकू दे हा बंध आपल्या नात्याचा. रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा..
- राखीच्या धाग्यांनी जुळलेलं हे नातं सदैव असं टिकून राहो, आणि आनंदाने फुलत राहो. रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!
- तुझं हास्य, तुझी काळजी, तुझा आधार – या सगळ्यातूनच मी समृद्ध आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी तुला अनंत शुभेच्छा!
