रक्षाबंधन ‘या’ राशीच्या भाऊ – बहिणींसाठी ठरणार लाभदाक, मिळणार गुडन्‍यूज, कोणती आहे तुमची रास

Navpancham Rajyog 2025: यंदाच्या वर्षीचं रक्षाबंधन 'या' राशीच्या भाऊ - बहिणींचं पालटणार नशीब... होणार मोठा फायदा आणि मिळणार गुडन्यूज, कोणती आहे तुमची रास?

रक्षाबंधन या राशीच्या भाऊ - बहिणींसाठी ठरणार लाभदाक, मिळणार गुडन्‍यूज, कोणती आहे तुमची रास
| Updated on: Jul 12, 2025 | 8:25 AM

Navpancham Rajyog 2025: भावा बहिणीच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. या दिवशी बहीण भावाला ओवाळते. त्याच्या हातात राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्याची कामना करत असते. सावन पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधन हा भाऊ – बहिणींचा सण साजरा केला जातो. यंदाच्या वर्ष 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन असून काही भाऊ – बहिणींसाठी रक्षाबंधन लाभदायक ठरणार आहे.

रक्षाबंधनाच्या दिवशी एक शक्तिशाली योग तयार होत आहे, जो 4 राशींच्या भावा-बहिणींना एक अद्भुत भेट देऊ शकतो. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सावन महिन्यात महत्त्वाचे ग्रह संक्रमण होत आहेत. 13 जुलै रोजी शनि वक्री होईल. त्यानंतर सूर्य संक्रमण करेल. 28 जुलै रोजी मंगळ संक्रमण करेल आणि कन्या राशीत प्रवेश करेल. त्यामुळे चार राशींसाठी यंदाची रक्षाबंधन लाभदायक ठरणार असं देखील सांगण्यात येत आहे.

कोणात्या राशीच्या भाऊ – बहिणींसाठी रक्षाबंधन ठरणार लाभदायक?

मेष : राशीच्या लोकांसाठी शनि, युरेनस आणि मंगळाची स्थिती त्रासदायक ठरू शकते. अनावश्यक खर्च कमी केल्याने तुम्हाला दिलासा मिळेल. आरोग्य सुधारेल. कुटुंबात काही मतभेद असतील तर ते आता दूर होतील.

वृषभ : तुमच्या आयुष्यात एक सकारात्मक काळ सुरू होईल आणि तुमचे एकामागून एक प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. एखादी मोठी इच्छा पूर्ण होऊ शकते. अविवाहितांचे लग्न निश्चित होऊ शकते. आर्थिक लाभ होईल. काही महत्त्वाचे काम पूर्ण झाल्याने तुम्ही आनंदी व्हाल.

मिथुन : या राशीच्या लोकांना काही चांगली बातमी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी सकारात्मक बदल होऊ शकतात. जुने कर्ज, आजार आणि खटल्यांमधून तुम्हाला आराम मिळेल. नवीन नोकरीची ऑफर येऊ शकते.

मीन : राशीच्या लोकांना शनीच्या साडेसतीच्या दुष्परिणामांपासून काही प्रमाणात दिलासा मिळेल. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल. करिअरमध्ये प्रगतीची शक्यता आहे. तुम्ही काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. तुमच्या व्यक्तिमत्त्वात दृढता येईल. तुमचा आत्मविश्वास वाढेल.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही…)