AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ram Mandir : राम मंदिर सोहळ्यासाठी 6 क्विंटल तूप अयोध्येत दाखल, यासाठी होणार वापर

यज्ञ कर्मासाठी अयोध्येत 6 क्विंटल 30 किलो तूप आणण्यात आले. हे तूप राजस्थानमधील गो शाळेतून आणण्यात आले आहे. हे तूप करसेवापुरममधील राम मंदिरात ठेवण्यात आल आहे. तर दूसरीकडे नेपाळवरून आणलेल्या पाण्याने प्रभू रामाला जलाभिषेक केला जाणार आहे.

Ram Mandir : राम मंदिर सोहळ्यासाठी 6 क्विंटल तूप अयोध्येत दाखल, यासाठी होणार वापर
अयोध्येत दाखल झालेले तूप Image Credit source: TV9 Marathi
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jan 04, 2024 | 3:46 PM
Share

अयोध्या :  22 जानेवारी 2024 ही तारीख इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरली जाणार आहे. अयोध्येत श्री रामाच्या मंदिराचे उद्घाटन अखेर होणार आहे. हा प्राणप्रतिष्ठापणेचा सोहळा न भूतो न भविष्यती असा राहाणार आहे. या सोहळ्यासाठी शेकडो पुरोहित आणि साधू संत उपस्थित राहाणार आहेत. एकीकडे रामललाची (Ramlala Abhishek) प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे तर दुसरीकडे मंदिर परिसरात भव्य यज्ञ आणि हवन होणार आहे. या विधीसाठी अयोध्येत 6 क्विंटल 30 किलो तूप दाखल झाले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात होणारा जगातला हा पहिलाच विधी असणार आहे.

या ठिकणाहून आणण्यात आले तूप

यज्ञ कर्मासाठी अयोध्येत 6 क्विंटल 30 किलो तूप आणण्यात आले. हे तूप राजस्थानमधील गो शाळेतून आणण्यात आले आहे. हे तूप करसेवापुरममधील राम मंदिरात ठेवण्यात आल आहे. तर दूसरीकडे नेपाळवरून आणलेल्या पाण्याने प्रभू रामाला जलाभिषेक केला जाणार आहे. नेपाळमधील पाण्याने भरलेले कलशदेखील अयोअध्येत दाखल झाले आहेत.

अयोध्येत 4 हजार साधूंना निमंत्रण

रामललाच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी अयोध्येत 4 हजार साधूंना निमंत्रण देण्यात आले आहे. याशिवाय पद्मभूषण,पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त मान्यवरांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. सगळ्या साधूंची व्यवस्था राम मंदिर ट्रस्टकडून केली जाणार आहे. या शिवाय कला,क्रीडा,सांस्कृतिक क्षेत्रातील 3 हजार व्यक्तींना सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आले आहे. 22 जानेवारीला 11 वाजल्यापासून सोहळ्याला सुरुवात होणार. व्यवस्था प्रमुख शरद शर्मा यांनी टीव्ही 9 मराठीला ही माहिती दिली.

मूर्तीची झाली निवड

अयोध्येतील मंदिराच्या गर्भगृहात रामललाची 51 इंची मूर्ती बसवण्यात येणार आहे. म्हैसूरच्या अरुण योगीराज यांनी बनवलेल्या मूर्तीची निवड करण्यात आली आहे. त्याची अधिकृत घोषणा 5 जानेवारी रोजी श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय करणार आहेत. अरुण योगीराज यांच्या मुर्तीच्या निवडीनंतर त्यांच्या म्हैसूरमधील कुटुंबात अभिमानाची भावना आहे. यापूर्वी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी मूर्ती निवडीबाबत माहिती देण्यासोबतच एक छायाचित्रही शेअर केले होते. मात्र, हे चित्र अभिषेकासाठी निवडलेल्या भगवान श्रीरामाच्या मूर्तीचे नाही. हे चित्र शिल्पकार योगीराज यांनी बनवलेल्या मूर्तींपैकी एक आहे.

Follow Us
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट