Horoscope 20th March 2021 : कोणत्या चार राशींना आज धनलाभ? जाणून घ्या तुमचं भविष्य

Namrata Patil

Updated on: Mar 20, 2021 | 8:27 AM

चला जाणून घेऊ आजचं राशीभविष्य (Rashifal Of 20 March 2021 Horoscope Astrology Of Today)

Horoscope 20th March 2021 : कोणत्या चार राशींना आज धनलाभ? जाणून घ्या तुमचं भविष्य
Horoscope

मुंबई : आज शनिवार 20 मार्च 2021…आज शनिवारी तुमचं राशीभविष्य काय सांगतं? कुणाला फायदा होणार (Horoscope Of 20 March), कुणाला सावध राहावं लागणार, कुठल्या राशीला काय मिळणार? याबद्दल जाणून घेऊया…

मेष आज तुम्ही एखाद्या गोष्टीची चिंता सतावेल. एखाद्या कार्यात तुम्हाला काही आव्हाने आणि अडचणींचा सामना करावा लागतो. दिवस व्यस्त असेल. व्यवसायात फायदा होईल. विचारपूर्वक कार्य करा आणि निर्णय घ्या. बोलण्यावर संयम ठेवा.

वृषभ

आजचा दिवस चांगला जाईल. तुमचा प्रभाव वाढेल. समाजात कौतुक होईल. नवीन लोकांशी मैत्री होईल. चांगल्या गुंतवणुकीचे योग जुळून येतील. व्यवसायानिमित्त परदेशात जाण्याची शक्यता आहे. तब्येत ठीक राहील. नोकरदारांना पदोन्नती मिळेल. अडचणींवर मात करता येईल.

मिथुन

सावध राहून आज काम करा. शत्रू कामात व्यत्यय आणू शकतात. नोकरी नवे बदल घडू शकतात. चांगली बातमी मिळेल. मन चंचल राहील. खाण्यापिण्याची काळजी घ्या. फिरायला जाण्याचे योग येतील. वाहन काळजीपूर्वक चालवा. कोणालाही अनावश्यक सल्ला देऊ नका.

कर्क

आजचा दिवस चांगला जाईल. नवीन संधी मिळेल. व्यवसाय करण्याच्या अनेक संधी मिळतील. रखडलेले काम पूर्ण होऊ शकेल. तरुणांना सतत प्रयत्न करावे लागतील. वैवाहिक जीवन सुखी होईल. विद्यार्थ्यांचा प्रश्न सुटेल. कामाच्या ठिकाणी नवे आव्हान मिळेल.

सिंह

आजचा दिवस ठीक होईल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. बर्‍याच संघर्षानंतर तुम्हाला यश मिळेल. ज्यामुळे आनंद मिळेल. खाण्यापिण्याची काळजी घ्या. खर्च अधिक होईल. नवीन प्रकल्पावर काम कराल. (Rashifal Of 20 March 2021 Horoscope Astrology Of Today)

कन्या

आजचा दिवस व्यस्त राहील. काम पूर्ण होईल. मित्रांकडून सहकार्य मिळेल. क्षेत्रात प्रभाव आणि जबाबदारी वाढेल. व्यवसायात नवीन करार करू शकता. तब्ब्येतीची काळजी घ्या. नातेवाईकांची भेट होईल. खर्च होईल.

तूळ

आज नशीब तुम्हाला साथ देईल. त्यामुळे चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. आदर आणि सन्मान वाढण्याचा योग आहे. कामात व्यस्तता वाढेल. नवीन संधी आणि नवीन लोकांची ओळख होईल. नवीन माहिती मिळेल. अनावश्यक खर्च टाळा. बाहेरील खाणे टाळा.

वृश्चिक

संयमाने काम करा, वादविवाद टाळा. मतभेद होऊ शकतात. आर्थिक परिस्थिती ठीक होईल. विद्यार्थ्यांमध्ये निराशा जाणवेल. आज महत्त्वपूर्ण निर्णय शक्यतो घेऊ नका. कोणतीही जोखीम घेऊ नका. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. जोडीदाराबरोबर मतभेद उद्भवू शकतात. अज्ञात लोकांमुळे हानी होऊ शकते.

धनू

आजचा दिवस व्यस्त असेल. व्यवसायात चढउतार येतील. व्यवसायात नुकसान झाल्यामुळे निराशा होईल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. अनावश्यक धावपळ वाढेल.

मकर

आजचा दिवस तुमच्या बाजूने आहे. प्रवासाचे योग आहेत. धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हाल. कौटुंबिक कार्यात मित्रांकडून सहकार्य मिळेल. ज्येष्ठांचे आशीर्वाद प्राप्त होतील. अडथळ्यामुळे कामावर परिणाम होईल. अनावश्यक खर्च करू नका.

कुंभ

आपण आज उत्साहित असाल. जोडीदारासोबतचे मतभेद दूर होतील. प्रवासामध्ये गैरसोय होऊ शकते. वाहन चालवताना खबरदारी घ्या. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. कठोर परिश्रम घ्यावे लागतील. कामाच्या ठिकाणी चांगली बातमी मिळेल. धनलाभ होईल.

मीन

सकारात्मक उर्जा मिळेल. कामात उत्साह वाढेल. आपण जे काही कराल त्यात यश मिळेल. मित्र आणि कौटुंबिक व्यक्तींचे सहकार्य मिळेल. पार्टी किंवा सहलीचे योग संभवतात. जोखीम संबंधित काम करताना सावधगिरी बाळगा. बोलताना काळजी घ्या. (Rashifal Of 20 March 2021 Horoscope Astrology Of Today)

संबंधित बातम्या : 

LIC Jeevan Lakshya : 105% परतावा देणारी धमाकेदार योजना, सुखी आयुष्यासाठी आताच करा प्लॅन

नव्या रंगात, नव्या ढंगात Bajaj Pulsar 180 सादर होणार, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI