AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mangalsutra: सौभाग्याचं लेणं असलेल्या मंगळसूत्राचे आहेत आरोग्यदायी फायदे

दोन सोन्याच्या वाट्या आणि काळ्या मण्यांनी बनवलेल्या मंगळसूत्राचे अनेक महत्त्व आहे. सोन्याचे दोन वाट्या सत्वगुणांशी  संबंधित आहेत, जे शिव आणि शक्तीचे प्रतीक दर्शवते. हृदययाच्या संबंधित समस्या दूर ठेवण्यासाठी देखील हे लाभदायक मानल्या जाते.

Mangalsutra: सौभाग्याचं लेणं असलेल्या मंगळसूत्राचे आहेत आरोग्यदायी फायदे
मंगळसूत्र Image Credit source: Social Media
| Updated on: Sep 08, 2022 | 8:38 AM
Share

मंगळसुत्रला (Mangalsutra) भारतीय संस्कृतीत सौभाग्याचं लेणं मानल्या जातं. प्राचीन काळापासून स्त्रियांच्या या दागिन्याला विशेष महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार मंगळसूत्र घालण्याचा संबंध थेट पतीच्या दीर्घायुष्याशी जोडल्या गेला आहे. असे मानले जाते की मंगळसूत्र पतीचे आयुष्य वाढवते. ते धारण केल्याने पती-पत्नीमध्ये प्रेम आणि बांधिलकी टिकून राहते. त्यामुळे लग्नात मुलींना मंगळसूत्र घातले जाते. मंगळसूत्राला संस्कृतमध्ये ‘मांगल्यतंतू’ असेही म्हणतात. यात दोन पदरी दो-यात काळे मणी गुंफलेले असतात. मध्यभागी 4 छोटे मणी व 2 लहान वाट्या असतात. एक पती, दुसरी पत्नीकडील. दोन दोरे म्हणजे पती-पत्नीचे बंधन. 4 काळे मणी म्हणजे धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चार पुरुषार्थ. आजकाल मंगळसूत्राच्या रचनेत अनेक बदल पाहायला मिळत आहेत, पण आजही खरे मंगळसूत्र हे काळे मणी आणि दोन वाट्याचे डिझाइन असलेले मानले जाते. दक्षिण भारतात आजही फक्त दोन वाट्यांच्या डिझाइनची मंगळसूत्रेच घातली जातात, पण तेथे काळ्या मण्यांऐवजी पिवळा धागा वापरण्याची पद्धत आहे.

मंगळसूत्राची आरोग्यदायी फायदे

दोन सोन्याच्या वाट्या आणि काळ्या मण्यांनी बनवलेल्या मंगळसूत्राचे अनेक महत्त्व आहे. सोन्याचे दोन वाट्या सत्वगुणांशी  संबंधित आहेत, जे शिव आणि शक्तीचे प्रतीक दर्शवते. हृदययाच्या संबंधित समस्या दूर ठेवण्यासाठी देखील हे लाभदायक मानल्या जाते. शक्यतो या वाट्यांवर कुठल्याही प्रकारचे डिझाईन नसावे. यासोबतच  काळे मोती वाईट नजर आणि नकारात्मक शक्तींपासून संरक्षण करतात असे मानले जाते.  शास्त्रानुसार मंगळसूत्रांमुळे रक्ताभिसरण सुधारते आणि शरीरातील  रक्तदाब  नियंत्रणात ठेवते. याच कारणामुळे ते छातीजवळ घातल्या जाते.  यासोबतच मंगळसूत्रातील तीन गाठी वैवाहिक जीवनातील तीन मुख्य गोष्टी दर्शवतात. प्रथम, गाठ एकमेकांबद्दल आदर, दुसरी पालकांबद्दलचे प्रेम आणि तिसरी गाठ देवाबद्दल आदर ठेवण्याची आठवण करून देते.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.