Spiritual: हिंदू धर्मात मुंडन करण्याचे महत्त्व, धार्मिक कारणांसोबतच जोडले आहे वैज्ञानिक कारण

भारत हा असंख्य प्रथा आणि परंपरांचा देश आहे. प्रत्येक धर्माचे वेगवेगळे नियम आहे. काही धर्मांचे नियम हे अगदीच एकमेकांच्या विरुद्धसुद्धा आहे.  हिंदूंमध्ये देखील  अनेक नियम आहेत. अगदी मुलाच्या जन्मापासून ते लग्न, अंत्यसंस्कार आणि सणांपर्यंत लोकांच्या वेगवेगळ्या चालीरीती आहेत. त्यांपैकी एक म्हणजे मुंडण सोहळा (Mundan reason). हा सोहळा हिंदू घरात जन्माला आलेल्या मुलाचा केला जोतो. मुंडन […]

Spiritual: हिंदू धर्मात मुंडन करण्याचे महत्त्व, धार्मिक कारणांसोबतच जोडले आहे वैज्ञानिक कारण
नितीश गाडगे

|

Jul 20, 2022 | 5:38 PM

भारत हा असंख्य प्रथा आणि परंपरांचा देश आहे. प्रत्येक धर्माचे वेगवेगळे नियम आहे. काही धर्मांचे नियम हे अगदीच एकमेकांच्या विरुद्धसुद्धा आहे.  हिंदूंमध्ये देखील  अनेक नियम आहेत. अगदी मुलाच्या जन्मापासून ते लग्न, अंत्यसंस्कार आणि सणांपर्यंत लोकांच्या वेगवेगळ्या चालीरीती आहेत. त्यांपैकी एक म्हणजे मुंडण सोहळा (Mundan reason). हा सोहळा हिंदू घरात जन्माला आलेल्या मुलाचा केला जोतो. मुंडन (Mundan) हा हिंदूंच्या 16 संस्कारांपैकी एक मानला जातो. त्यांपैकी काहींकडे मुलगा आणि मुलगी दोघांचे मुंडण करतात, तर काही लोक फक्त मुलांचे मुंडण केले जाते. परंतु असे असले तरी, यामध्ये धार्मिक आणि शास्त्रीय दोनीही करणं आहेत.

अनेकदा हिंदू कुटुंबांमध्ये जन्माच्या वेळी, मुलगा झाला तर एखाद्या ठिकाणी येऊन मी मुलाचे मुंडण करेन असं लोक म्हणतात. ज्यामुळे ते आपल्या मुलाचे केस त्या ठिकाणाला जाऊन देतात. हे लोकांनी नवस केल्यामुळे केलं जातं. परंतु तुम्हाला माहिती आहे काय, जन्माला आलेल्या लहान मुलाचं मुंडण करण्यामागेही एक विज्ञान दडलेले आहे, जे फारच कमी लोकांना ठावूक असेल. होय, जर आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर मुलाच्या डोक्यावरील केस काढण्याला खूप महत्वाचे आहे.

काय आहे शास्त्रीय कारण?

  1. मुलांच्या डोक्यावरचे केस काढल्याने त्यांच्या शरीराचे तापमानही नियंत्रित होते. मुलाचे मुंडण केल्यावर त्याला फोड, मुरुम, जुलाब यांसारख्या आजारांपासून मुक्ती मिळते. त्याच वेळी, त्याचे डोके देखील थंड राहाते.
  2. नऊ महिने आईच्या उदरात राहून मूल जेव्हा या जगात येते, तेव्हा त्याच्या डोक्यात अनेक जंतू असतात. हे जंतू आणि बॅक्टेरिया शॅम्पूनेही काढता येत नाहीत. यामुळे, मुलांचे केस काढले जातात. ज्यामुळे हे सर्व जंतू आणि बॅक्टेरिया निघून जातात.
  3. मुंडण केल्यावर, मुलाच्या डोक्यावरील सर्व केस काढले जातात, ज्यामुळे सूर्यप्रकाश थेट त्याच्या डोक्यावर पडतो. हा सूर्यप्रकाश मेंदूच्या विकासासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे पेशी कार्यान्वित होतात आणि नसांमध्ये रक्तप्रवाह चांगला होतो.
  4.  मुंडण केल्याने मुलांना सहज दात येतात असा एक वैज्ञानिक समजही आहे. सामान्यतः जेव्हा मुलाचे दात येतात, तेव्हा त्याला जुलाब होऊ लागतो. यासोबतच तापही येतो. पण मुंडण केले तर दात येण्यास फारशी अडचण येत नाही.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

हे सुद्धा वाचा


Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें