Ganga Mandir: भारतातल्या ‘या’ ठिकाणी आहे रहस्यमयी शिव मंदिर, पायऱ्यांवरून येतो विशिष्ट आवाज

श्रावण महिन्यात (Shrawan Month) भगवान भोलेनाथाची विशेष पूजा केली जाते. हिंदू धर्मात अशी मान्यता आहे की, भगवान शिवाला श्रावण महिना प्रिय आहे आणि या काळात भगवान शंकराची पूजा केल्यास भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. 14 जुलैपासून श्रावण महिना सुरू होत आहे. या निमित्याने देशातील एका प्रसिद्ध आणि रहस्यमयी शिव मंदिराबद्दल (Mysterious Shiva Temple) जाणून घेऊया, […]

Ganga Mandir: भारतातल्या 'या' ठिकाणी आहे रहस्यमयी शिव मंदिर, पायऱ्यांवरून येतो विशिष्ट आवाज
Follow us
| Updated on: Jul 12, 2022 | 3:41 PM

श्रावण महिन्यात (Shrawan Month) भगवान भोलेनाथाची विशेष पूजा केली जाते. हिंदू धर्मात अशी मान्यता आहे की, भगवान शिवाला श्रावण महिना प्रिय आहे आणि या काळात भगवान शंकराची पूजा केल्यास भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. 14 जुलैपासून श्रावण महिना सुरू होत आहे. या निमित्याने देशातील एका प्रसिद्ध आणि रहस्यमयी शिव मंदिराबद्दल (Mysterious Shiva Temple) जाणून घेऊया, या मंदिरात भक्तांची कायमच रीघ लागलेली असते. हे मंदिर उत्तर प्रदेशातील गढमुक्तेश्वर (Gadhmukteshwar) येथे स्थित एक प्राचीन गंगा मंदिर (Ganga mandir) आहे. या प्राचीन मंदिरात माता गंगासोबतच पिता ब्रह्माजींची चार हात असलेली पांढऱ्या रंगाची मूर्ती स्थापित आहे आणि या मंदिरात एक चमत्कारी शिवलिंग देखील आहे. श्रावण महिन्यात येथे शिवपूजनासाठी भाविकांची मोठी रांग असते.

अतिप्राचीन आहे मंदिर

गढमुक्तेश्वर येथील गंगा मंदिर खूप जुने असून येथील इतिहास कोणालाच माहीत नाही. या मंदिराची स्थापना कोणी आणि केव्हा केली याबद्दल कोणालाही माहिती नाही. गढमुक्तेश्वर येथील प्राचीन गंगा मंदिराला भेट देण्यासाठी 101 पायऱ्या चढून जावे लागते.

कार्तिक महिन्यात जत्रा भरते

या मंदिरात कार्तिक महिन्यात शिवलिंगाच्या दर्शनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, मात्र श्रावण महिन्यातही भाविकांची मोठी रांग असते. मंदिरात असलेल्या शिवलिंगाबाबत अशी आख्यायिका आहे की, दरवर्षी कार्तिक महिन्यात त्यावर आपोआप एक विशेष आकृती उमटते. मंदिराच्या पुजाऱ्याच्या म्हणण्यानुसार, शिवलिंगावरील ती आकृती प्रत्येक वेळी वेगळ्या आकारात आणि रूपात प्रकट होते. आजही अनेक तज्ञ आणि शास्त्रज्ञ याचे रहस्य उलगडू शकलेले नाहीत.

हे सुद्धा वाचा

मंदिराच्या पायऱ्यांवरून आवाज येतात

गढमुक्तेश्वर येथील प्राचीन गंगा मंदिर उंचावर वसलेले असून येथील पायऱ्या अतिशय गूढ दगडाने बनवलेल्या आहेत. या पायऱ्यांवर कोणीही चढतो किंवा दगड फेकतो तेव्हा पाण्यात दगडफेक झाल्यासारखा आवाज येतो. प्राचीन काळी गंगा नदीचे पाणी या मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत पोहोचत असे, परंतु आता गंगा नंदी मंदिरापासून सुमारे 5 किलोमीटर दूर आहे.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.