भारतातील सर्वांत श्रीमंत 5 बाबा, ज्यांची संपत्ती जाणून व्हाल थक्क

Richest Naba in India : भारतात हिंदू धर्माचा प्रचार, प्रसार करणारे अनेक संतबाबा आहेत. ज्यांच्या संपत्तीचा आकडा देखील फार मोठा आहे. आज अशाच 5 साधूबाबांबद्दल जाणून घेवू ज्यांची संपत्ती कोट्यवधी रुपयांमध्ये आहे. त्यांच्या संपत्तीचा आकडा जाणून तुम्हीही हैराण व्हाल...

भारतातील सर्वांत श्रीमंत 5 बाबा, ज्यांची संपत्ती जाणून व्हाल थक्क
| Updated on: Feb 23, 2025 | 3:30 PM

Richest Naba in India : भारतात हिंदू धर्माचा प्रचार, प्रसार करणारे अनेक संतबाबा आहेत. भारतात काही बाबा असे देखील आहे जे कायम त्यांच्या अनुयायांना योग्य मार्गदर्शन करणाताना दिसतात. अनेक ठिकाणी होत असलेल्या कार्यक्रमांच्या माध्यमातून बाबा अध्यात्मीक ज्ञान देत असतात. सोशल मीडियावर त्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. भारतात असे काही बाबा आहेत, ज्यांची संपत्ती देखील फार तडगी आहे. त्यांच्या संपत्तीचा आकडा देखील थक्क करणारा आहे.

बाबा रामदेव : योग गुरु बाबा रामदेव आयुर्वेद, व्यवसाय, राजकारण आणि कृषी क्षेत्रातील त्यांच्या कार्यासाठी ओळखले जातात. रामदेव बाबा यांनी पतंजली आयुर्वेद लिमिटेडची सुरुवात केली. रिपोर्टनुसार, त्यांची संपत्ती जवळपास 1,600 कोटी आहे.

श्री श्री रविशंकर : श्री श्री रविशंकर यांचे 151 देशांमध्ये अंदाजे 300 दशलक्ष अनुयायी आहेत. सोशल मीडियावर त्यांचे अनेक अध्यात्मीक व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात. श्री श्री रविशंकर हे आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनचे संस्थापक आहेत. रिपोर्टनुसार, त्यांच्याकडे आर्ट ऑफ लिव्हिंग केंद्रे, आरोग्य आणि फार्मसी केंद्रांसह अंदाजे 1000 कोटी रुपयांची मालमत्ता आहे.

सद्गुरु जग्गी वासुदेव: सद्गुरुंनी ईशा फाउंडेशनची स्थापना केली आहे. एवढंच नाही तर, 13 एप्रिल 2027 रोजी सद्गुरूंना प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यांची अंदाजे एकूण संपत्ती 18 कोटी रुपये आहे.

आसाराम बापू: परदेशात त्यांचे एकूण 350 आश्रम आहेत. याशिवाय त्यांच्याकडे 17 हजार बालसंस्कार केंद्रे आहेत. 2021 पर्यंत आसाराम बापूंच्या ट्रस्टची वार्षिक उलाढाल 350 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याची माहिती समोर आली होती.

प्रेमानंद महाराज : प्रसारमाध्यमातील बातम्यानुसार प्रेमानंद महाराज यांच्याकडे कोणतीही खाजगी मालमत्ता नाही.त्याच्याकडे कोणत्याही स्वरुपाची अचल संपत्ती नाही. प्रेमानंद महाराज यांनी स्पष्ट केलेय की त्यांच्याकडे खाजगी कार देखील नाही.ही कार त्यांच्या सेवकांची आहे.जे ते प्रवास करताना वापरतात.

प्रेमानंद महाराज म्हणतात की जेथे ते राहतात त्याचे वीजबिल देखील भक्तच भरतात, प्रेमानंद महाराज अनेकांना पायी पदयात्रा करताना दिसतात. परंतू काही वेळा ते ऑडी कारमध्ये बसलेले ही दिसतात. सोशल मीडियावर त्यांचे व्हिडीओ देखील तुफान व्हायरल होत असतात.