AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sadesati : शनीच्या साडेसातीपासून बचावाचा हा आहे सर्वात सोपा उपाय, सर्व त्रासातून होते मुक्ती

शनीच्या अशुभ प्रभावापासून वाचण्यासाठी शास्त्रात काही खास उपाय सांगण्यात आले आहेत.  जाणून घेऊया साडेसातीचा त्रास कमी करण्याचे काही सोपे उपाय.

Sadesati : शनीच्या साडेसातीपासून बचावाचा हा आहे सर्वात सोपा उपाय, सर्व त्रासातून होते मुक्ती
शनीदेवImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Feb 23, 2023 | 11:53 AM
Share

मुंबई : शनि देव न्यायप्रिय आहेत. ते लोकांना त्यांच्या कर्माप्रमाणे फळ देतात. ज्योतिषशास्त्रानुसार जर एखादी व्यक्तीची साडेसाती (Sadesati) सुरू असेल तर त्याला आयुष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. शनि जर अनुकूल नसेल तर पैसा, करिअर, व्यवसाय आणि नातेसंबंधात अडचणींना सामोरे जावे लागते. शनिदेवाच्या अशुभ प्रभावामुळे शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही समस्यांना सामोरे जावे लागते. म्हणूनच शनीच्या अशुभ प्रभावापासून वाचण्यासाठी शास्त्रात काही खास उपाय सांगण्यात आले आहेत.  जाणून घेऊया साडेसातीचा त्रास कमी करण्याचे काही सोपे उपाय.

साडेसातीसाठी उपाय

  1. शनिदेवाच्या अशुभ प्रभावापासून दूर राहायचे असेल, तर हनुमान चालिसाचे पठण करणे हा सर्वात सोपा मार्ग आहे. श्री हनुमान चालिसाचा पठण केल्याने शनिदेवाचे सर्व संकट दूर होतात असे म्हणतात.
  2. सात मुखी रुद्राक्ष धारण केल्यानेही शनिदेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो. हा रुद्राक्ष सोमवारी किंवा शनिवारी गंगाजलाने धुऊन धारण करावा. यामुळे शनिदोष दूर होतो.
  3. शनिवारी काळ्या कुत्र्यांना आणि काळ्या गायींना भाकरी खाऊ घातल्याने शनीचा प्रकोप दुर होतो. शनिवारी मुंग्यांना पीठ खाऊ घातल्याने शनीचा वाईट प्रभाव कमी होतो.
  4. ज्योतिष शास्त्रानुसार मधल्या बोटात काळ्या घोड्याची नाल किंवा खिळ्याने बनलेली अंगठी धारण केल्याने शनीच्या प्रकोपापासून वाचू शकते. हे काम शनिवारी सूर्यास्ताच्या वेळीच करा.
  5. सत्याचे समर्थन करणाऱ्याला शनि नेहमीच साथ देतो. म्हणूनच नेहमी खरे बोला. यासोबतच शनीच्या मंत्रांचा जप आणि शनिशी संबंधित वस्तूंचे दान केल्यानेही शनीची साडेसाती कमी होऊ शकते.
  6. जर तुम्ही शनि साडेसातीच्या प्रभावाखाली असाल तर शनिवारी तीळ आणि मुगाच्या डाळीचे दान करा. हे दान गरीब ब्राह्मण आणि गरजूंना द्यावे.
  7. साडेसातीचा प्रभाव कमी करण्यासाठी शनिवारी संपूर्ण उडीद, लोखंड, काळे वस्त्र, तीळ, तेल इत्यादी शनिदेवाला अर्पण करा. त्यानंतर ते एखाद्या गरीब आणि गरजू ब्राह्मणाला दान करा.
  8. दर शनिवारी पिंपळाच्या झाडाच्या मुळास जल अर्पण करून दिवा लावा आणि सात वेळा प्रदक्षिणा करा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान