Sankashti Chaturthi 2025 Chandrodya Time, Puja Vidhi in Marathi : आज संकष्टी चतुर्थी, चंद्रोदय कधी ? पूजा विधीही घ्या जाणून

Sankashti Chaturthi 2025 Chandrodya Time : हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीचा दिवस खूप खास असतो. गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी, 10 दिवसांचा गणेशोत्सव होऊन बाप्पा नुकतेच आपल्या घरी गेले असून त्यांच्या आठवणीत भावूक झालेल्या भक्तांसाठी आजचा दिवसही खूप खास आहे. संकष्टी चतुर्थीच्या पूजेची विधी, चंद्रोदय कधी होणार हे सगळं जाणून घ्या..

Sankashti Chaturthi 2025 Chandrodya Time, Puja Vidhi in Marathi : आज संकष्टी चतुर्थी, चंद्रोदय कधी ? पूजा विधीही घ्या जाणून
संकष्टी चतुर्थी
Image Credit source: social media
| Updated on: Sep 10, 2025 | 10:05 AM

Sankashti Chaturthi 2025 Chandrodya Time, Puja Vidhi : कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी (Sankashti Chaturthi 2025) म्हणतात. आज (बुधवार 10 सप्टेंबर) संकष्टी चतुर्थी असून या दिवशी श्री गणेशाच्या आराधनेला विशेष महत्त्व असतं. गणेशोत्सव नुकताच पार पडला असून सर्वांच्या लाडक्या बाप्पाला वाजत गाजत निरोप देण्यात आला. मात्र लाडका गणराय घरी गेल्याने त्याचे भक्त आठवणीने भावूक झालेले असतानाच आज संकष्टी चतुर्थीनुळे त्यांना पुन्हा गजाननाचीची आराधना करता येणार आहे.

आज संकष्टी असून दुपारी 3 वाजून 37 मिनिटांनी हि तिथी सुरू होणार आहे तर उद्या म्हणजेच गुरूवार, 11 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजून 45 मिनिटांनी ही तिथी समाप्त होईल. गणपतीला विघ्नहर्ताही म्हटलं जातं, त्यामुळे आजच्या दिवशी या गणेशाची पूजा केली जाते. अष्टविनायकाच्या आठ रूपांपैकी भगवान विघ्नराज हे भगवान गणेशाचे सातवे रूप आहे. धार्मिक मान्यतेनुसार, गणेशाच्या या रूपाची पूजा केल्याने सर्व प्रकारचे अडथळे नष्ट होतात आणि कामात यश मिळते.
आज अनेकांचा उपवासही असतो.

चंद्रोदयाचा मूहूर्त कधी ? (Sankashti Chaturthi Chandrodya Time Today)

आजच्या दिवशी उपास करून अनेक जण चंद्रोदयानंतर गणपतीची आरती करून मग भोजन ग्रहण करतात. आजच चंद्र कधी दिसणार ते जाणून घेऊया. संकष्टीच्या दिवशी आज चंद्रोदयाचा मुहूर्त हा रात्री 8 वाजून 6 मिनिटांनी आहे.

संकष्टी चतुर्थी पूजा विधि

या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. त्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करावे.

त्यानंतर घरातील पूजागृह किंवा देव्हारा हा गंगाजलाने शुद्ध करावा. तेथे लाल कापड पसरावे.

त्यानंतर देव्हाऱ्यात गणरायाची छोटी मूर्ती असल्यास ती स्थापित करावी.

यानंतर, हातात पाणी आणि तांदूळ धरून उपवासाची प्रतिज्ञा घ्या.

त्यानंतर विधीनुसार गणपतीला अभिषेक करावा.

त्याच्यासमोर तुपाचे निरांजन, उदबत्ती लावावी.

गणपतीला अक्षता, लाल फूल (जास्वंद), दूर्वा अर्पण कराव्यात.

देवासमोर नैवेद्य दाखवा.

श्रीगणेशाच्या मंत्रांचा जप करा.

संकष्टी चतुर्थीच्या व्रताची कथाही ऐकू शकता.

शेवटी, विधीनुसार गणपतीची आरती करा.

त्यानंतर, रात्री चंद्रोदय झाल्यावर आरती करून भोजन करावे.

संकष्टी व्रत मंत्र (Sankashti Chaturthi Mantra)

ॐ गं गणपते नमः

ॐ विघ्नराजाय नमः

प्रणम्य शिरसा देवां गौरीपुत्रं विनायकम्।

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)