संकष्टी चतुर्थी ‘या’ 5 राशींसाठी ठरेल फलदायी… हा विशेष योग ठरेल लाभदायक, कोणती आहे तुमची रास?
ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची स्थिती बदलली की त्याचा राशीचक्रावर परिणाम होतो... असं म्हणतात, ज्याचे चांगले वाईट परिणाम 12 राशींवर होत असतात. आज 2 ऑगस्ट आणि संकष्टी चतुर्थी देखील आहे, ज्यामुळे एक खास योग तयार होत असून, त्याचा फायदा 5 राशींना होणार आहे. म्हणून जाणून घ्या कोणती आहे तुमची रास...

रविवार, 2 ऑगस्ट 2026 म्हणजे गजानन संकष्टी चतुर्थीचा दिवस. हा दिवस भगवान गणेशाची पूजा करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. आज संकष्टी चतुर्थी असून एक खास योग तयार होत असून, त्याचा फायदा 5 राशींना होणार आहे. आजच्या दिवशी रोजी राहू, केतू आणि मंगळ यांसह अनेक प्रमुख ग्रहांचं गोचर होत आहे. यासोबतच गुरु-आदित्य योग आणि बुध-मंगळ युती यांसारखे शुभ योग घडून येतील. ज्योतिषांच्या मते, या ग्रहयोगामुळे करिअर, नोकरी, व्यवसाय आणि उत्पन्नामध्ये लाभाची शक्यता वाढेल. विशेषतः 5 राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत शुभ आणि फलदायी ठरू शकतो.
मिथुन: मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी एक नवीन अध्याय सुरू होऊ शकतो. मंगळ आणि बुध ग्रहांचा प्रभाव तुमच्यासाठी अनुकूल असेल. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये वेगाने प्रगती करण्याची संधी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या नियोजन कौशल्याचे कौतुक होईल आणि तुम्हाला एक मोठा प्रकल्प सोपवला जाऊ शकतो. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुम्हाला एक चांगली बातमी मिळू शकते.
कर्क: कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरू शकतो. सूर्य आणि गुरूच्या प्रभावामुळे तुमची प्रतिष्ठा वाढू शकते. बऱ्याच काळापासून रखडलेली एखादी योजना पुढे सरकू शकते. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर खूश असतील आणि पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची चिन्हे आहेत. तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी एक मोठा ग्राहक मिळू शकतो.
कन्या: शुक्राच्या प्रभावामुळे तुमच्या आयुष्यात नवीन संधी निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे करिअरमध्ये प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे फळ मिळण्याची शक्यता आहे आणि तुम्हाला नवीन नोकरीची संधी मिळू शकते. व्यवसायातील नफा वाढू शकतो. तुमच्या उत्पन्नात सातत्यपूर्ण सुधारणा दिसून येईल. तुम्ही घरातील सुखसोयींवर पैसे खर्च करू शकता आणि मालमत्तेसंबंधीचे निर्णय तुमच्या बाजूने लागू शकतात.
वृश्चिक: वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस धैर्य आणि यशाचा असू शकतो. रखडलेली कामे पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. तुमच्या करिअरमध्ये मोठा बदल होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी तुमचे नेतृत्व इतरांवर प्रभाव टाकेल. नवीन जबाबदारीमुळे तुमचे भविष्य अधिक उज्ज्वल होऊ शकते. व्यवसाय विस्ताराच्या योजना यशस्वी होऊ शकतात.
मीन : तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये एक नवीन दिशा मिळू शकतं. तुमच्या मेहनतीचं कामाच्या ठिकाणी उघडपणे कौतुक केले जाईल. एका वरिष्ठ व्यक्तीच्या पाठिंब्यामुळे तुम्हाला प्रगती करण्यास मदत होईल. नवीन व्यावसायिक भागीदारी फायदेशीर ठरू शकते. उत्पन्न वाढवण्याच्या योजना यशस्वी होऊ शकतात. थकीत रक्कम मिळाल्याने दिलासा मिळेल. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल.
(डिस्क्लेमर : सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)