AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sarvapitru Amavasya : सर्वपितृ अमावस्येला इंद्र योगात करा श्राद्ध, मिळेल पितरांचा आशिर्वाद

ज्यांना आपल्या पूर्वजांची मृत्युतिथी आठवत नाही, ते सर्वपितृ अमावस्येला त्यांचे श्राद्ध करू शकतात. या दिवशी ब्राम्हणांना भोजनदान करण्याची पद्धत आहे. ब्राम्हणांना भोजनदान दिल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते अशी मान्यता आहे.

Sarvapitru Amavasya : सर्वपितृ अमावस्येला इंद्र योगात करा श्राद्ध, मिळेल पितरांचा आशिर्वाद
सर्वपितृ अमावस्याImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Oct 13, 2023 | 7:29 PM
Share

मुंबई : दरवर्षी अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीच्या दुसऱ्या दिवशी सर्वपितृ अमावस्या (Sarvapitru Amavasya 2023) येते. यंदा सर्वपित्री अमावस्या 14 ऑक्टोबरला म्हणजेच उद्या आहे. या दिवशी पितृ पक्षाची समाप्ती होते. सर्वपित्री अमावस्येला पितरांची विशेष पूजा केली जाते. गरुड पुराणानुसार, पितरांची पूजा केल्याने मनुष्याला नश्वर जगात सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते. सर्वपितृ अमावस्येला दुर्मिळ इंद्र योग तयार होत आहे. या योगात पितरांना नैवेद्य अर्पण करणे शुभ असते. असे केल्याने पितर प्रसन्न होतात आणि कुटुंबावर आशीर्वादाचा वर्षाव करतात.

सर्वपितृ अमावस्या मुहूर्त

आश्विन महिन्यातील अमावस्या तिथी 13 ऑक्टोबर रोजी रात्री 09.50 वाजता सुरू होईल आणि 14 ऑक्टोबर रोजी रात्री 11.24 वाजता समाप्त होईल. उदय तिथीनुसार 14 ऑक्टोबर ही सर्वपितृ अमावस्या आहे. या दिवशी तुम्ही कॅलेंडरने ठरविलेल्या वेळेनुसार तुमच्या पूर्वजांना श्रद्धांजली अर्पण करू शकता.

पंचांग

  • ब्रह्म मुहूर्त – दुपारी 04:41 ते संध्याकाळी 05:31 पर्यंत.
  • अभिजीत मुहूर्त – सकाळी 11:44 ते 12:30 पर्यंत.
  • विजय मुहूर्त – दुपारी 02:02 ते 02:48 पर्यंत.
  • संध्याकाळची वेळ – 05:53 pm ते 06:18 pm.
  • निशिता मुहूर्त – दुपारी 11:42 ते 12:32 पर्यंत.

अशुभ वेळ

  • राहुकाल – सकाळी 09.14 ते 10.40 पर्यंत.
  • गुलिक काल – सकाळी 06.21 ते 06.18 पर्यंत.
  • दिशा शूल – पूर्व.

इंद्रयोगात दाखवावा नैवेद्य

अश्विन महिन्यातील अमावास्येला इंद्र योग तयार होत आहे. ज्योतिष शास्त्रात इंद्र योग शुभ कार्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. या योगात पितरांचे श्राद्ध केल्याने साधकाला शुभ फल प्राप्त होते. हा योग सकाळी 10:25 वाजता सुरू होईल.

पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा

सर्वपित्री अमावस्येला पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे खूप शुभ मानले जाते. याशिवाय शनिदेवही यामुळे प्रसन्न होतात.

गरिबांना अन्नदान करा

गरजूंना मदत केल्याने भगवान शनि खूप प्रसन्न होतात. त्यामुळे सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी गरिबांना भोजन द्यावे.

सर्व पितृ अमावस्येला पितरांना असा द्या निरोप

ज्यांना आपल्या पूर्वजांची मृत्युतिथी आठवत नाही, ते सर्वपितृ अमावस्येला त्यांचे श्राद्ध करू शकतात. या दिवशी ब्राम्हणांना भोजनदान करण्याची पद्धत आहे. ब्राम्हणांना भोजनदान दिल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते अशी मान्यता आहे. आंघोळ करून शुद्ध आचरणाने स्वयंपाक तयार करा. स्वयंपाक सात्विक असावा आणि त्यात खीर असावी. पितरांच्या फोटोला हार घालावा. त्यांची पूजा करावी व घरी बनविलेल्या अन्नाचा नैवैद्य दाखवावा.  त्यानंतर पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...