AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shani Amavasya: शनिची साडेसाती लागलीय? 27 ऑगस्ट महत्त्वाचा दिवस.. दोन विशेष योग, वाचा सविस्तर!

या शुभ योगामध्ये शनिदेवाची उपासना, उपाय  केले जातात. पंचांगानुसार, भाद्रपद महिन्यातील अमावस्या तिथी 26 ऑगस्ट, गुरुवारी 12:24 पासून सुरू होईल, जी शनिवार 27 ऑगस्ट रोजी 01:47 पर्यंत राहील.

Shani Amavasya: शनिची साडेसाती लागलीय? 27 ऑगस्ट महत्त्वाचा दिवस.. दोन विशेष योग, वाचा सविस्तर!
शनी अमावस्या
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Aug 22, 2022 | 2:14 PM
Share

Shani Amavashya: अमावास्येला पितरांची तिथी मानली जाते. यावेळी भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या 27 ऑगस्ट, शनिवारी येत आहे. या अमावास्येला पुराणात कुशाग्रही अमावस्या (Kushagrahi Amavasya) असे म्हटले आहे. शनिवारी येणार्‍या या अमावस्यामुळे याला शनी अमावस्या म्हणतात. या शुभ योगामध्ये शनिदेवाची उपासना, उपाय  केले जातात. पंचांगानुसार, भाद्रपद महिन्यातील अमावस्या तिथी 26 ऑगस्ट, गुरुवारी 12:24 पासून सुरू होईल, जी शनिवार 27 ऑगस्ट रोजी 01:47 पर्यंत राहील. अमावस्या तिथीचा सूर्योदय 27 ऑगस्ट रोजी होणार असल्याने अमावस्याशी संबंधित सर्व उपाय, पूजा इत्यादी देखील याच दिवशी कराव्यात. या दिवशी पद्म आणि शिव नावाचे 2 शुभ योग देखील जुळून येत आहे.

या दिवशी दान करण्याला विशेष महत्त्व

अमावस्या ही पितरांची तिथी आहे. त्यामुळे या दिवशी पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध, तर्पण वगैरे करण्याची परंपरा आहे. ज्या लोकांच्या कुंडलीत पितृ दोष आहे त्यांनी या दिवशी काही विशेष उपाय केल्यास या दोषाचा अशुभ प्रभाव कमी होऊ शकतो. यावेळी शनिचरी अमावस्येच्या योगामुळे हा दिवस अधिकच विशेष बनला आहे.  यावेळी ज्यांना शनीची साडेसाती आणि ढय्याचा त्रास होतो, त्यांनी या दिवशी शनिदेवाला प्रसन्न करण्याचे उपाय केल्यास त्यांचा त्रासही कमी होऊ शकतो.

या अमावस्येला कुशाग्रही का म्हणतात?

भाद्रपद महिन्यातील अमावस्याला कुशग्रही अमावस्या म्हणतात कारण या तिथीला कुश नावाच्या गवताचा गोळा करण्याची परंपरा आहे जी पूजेत वापरली जाते. कुश गवताळ दर्भसुद्धा म्हणतात. वैदिक विधी करणारे  या तिथीला कुश गवत म्हणजेच दर्भ गोळा करतात जेणेकरून वेळ आल्यावर त्याचा वापर करता येईल. श्राद्ध विधी करताना दर्भाची अंगठी  घालण्याची पद्धत  आहे. कुशापासून बनवलेली आसने देखील खास मंत्रोच्चारासाठी वापरली जातात.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?