2025 पर्यंत या राशींना राहावे लागेल सावध, करावा लागेल शनिच्या प्रकोपाचा सामना

नितीश गाडगे,  Tv9 मराठी

Updated on: Jan 25, 2023 | 7:57 AM

अशा अनेक राशी आहेत ज्यांना शनि साडेसाती आणि अडिचकीचा प्रकोप दीर्घकाळ सहन करावा लागेल. जाणून घ्या अशा तीन राशींबद्दल जे सन 2025 मध्ये शनीच्या साडेसाती आणि अडिचकीपासून मुक्त होतील.

2025 पर्यंत या राशींना राहावे लागेल सावध, करावा लागेल शनिच्या प्रकोपाचा सामना
शनीदेव
Image Credit source: Social Media

मुंबई, शनि हा न्याय आणि कर्म देणारा ग्रह मानला जातो. असे मानले जाते की, शनिदेव व्यक्तीला त्याच्या चांगल्या-वाईट कर्मानुसार शुभ किंवा अशुभ फळ देतात. नवग्रहातील शनी हा एकमेव ग्रह आहे जो सर्वात मंद गतीने फिरतो. या कारणास्तव, तो साडेसात वर्षे (Shani Sadesati) एका राशीत राहतो. या दशेला शनिदेवाची सती म्हणतात. नवीन वर्ष 2023 मध्ये शनि ग्रह आपली राशी बदलत आहे. ज्यामध्ये अनेक राशींना शनीच्या साडेसातीपासून सुटका मिळेल. परंतु अशा अनेक राशी आहेत ज्यांना शनि साडेसाती आणि अडिचकीचा प्रकोप दीर्घकाळ सहन करावा लागेल. जाणून घ्या अशा तीन राशींबद्दल जे सन 2025 मध्ये शनीच्या साडेसाती आणि अडिचकीपासून मुक्त होतील.

2025 पर्यंत या राशींना शनीची साडेसाती असेल

मकर

ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, मकर राशीच्या लोकांची साडेसाती 26 जानेवारी 2017 रोजी सुरू झाली. यासोबतच तिसरा टप्पा 12 जुलै 2022 पर्यंत चालणार आहे. यानंतर पुन्हा 18 जानेवारी 2023 रोजी शनीची साडेसती सुरू होईल जी 29 मार्च 2025 रोजी संपेल.

कुंभ

शनिदेवाने 24 जानेवारी 2022 ला सुरुवात केली आणि त्यातून मुक्ती 3 जून 2027 मिळेल. परंतु कुंभ राशीच्या लोकांना शनीची महादशेतून सुटका 23 फेब्रुवारी 2028 रोजी मिळेल . साडेसातीचा दुसरा टप्पा सर्वात त्रासदायक मानला जातो. या टप्प्यात या राशीच्या लोकांना मानसिक, शारीरिक आणि आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते.

मीन

29 एप्रिल 2022 रोजी मीन राशीवर शनीची साडेसाती सुरू झाली तेव्हा शनीने कुंभ राशीत प्रवेश केला. 29 मार्च 2025 रोजी शनि कुंभ राशीत जाईल, नंतर थोडासा दिलासा मिळेल. मात्र, शनीची साडेसाती आणि अडिचकीपासून 17 एप्रिल 2030 रोजी सुटका होईल.

साडेसातीत करा हे उपाय

  1. प्रत्येक शनिवारी विधीनुसार शनिदेवाची पूजा केल्यास शनिदेवाची कृपा प्राप्त होते.
  2. गरजूंना मदत करा, शनिशी संबंधित गोष्टी शक्यतो दान करा.
  3.  शनीला बळ देण्यासाठी उजव्या हाताच्या मधल्या बोटात लोखंडी अंगठी घाला. घराच्या दारावर घोड्याची नाल लावा
  4.  दर शनिवारी शनीला तांबे आणि तिळाचे तेल अर्पण करा.
  5.  शनिवारी शनि स्तोत्राचे पठण करा.
  6. शनिवारी  नियमितपणे कावळ्याला धान्य खाऊ घाला. मुंग्यांना मध किंवा साखर खाऊ घाला.
  7.  अपंग लोकांची शक्य तितकी सेवा करा.

शनी ग्रहासाठी काही उपाय

लक्षात ठेवा सूर्यास्तानंतर शनिदेवाची पूजा करणे अधिक फलदायी मानले जाते. त्यामुळे शनिदेवाची पूजा आणि शनी ग्रहाचे उपाय हे सूर्यास्तानंतरच करावेत, असा सल्लाही ज्योतिष शास्त्राच्या तज्ज्ञांनी दिला आहे कारण शनिदेवाची वेळ सूर्यास्तानंतरच सुरू होते. शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा. यानंतर शनिदेवाचे ध्यान करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. शक्य असल्यास शनिदेव ॐ शनिश्चराय नमः या मंत्राचा जप करावा.

एक वाटी मोहरीचे तेल घ्या. या तेलात आपली प्रतिमा पहा. त्यानंतर हे तेल कोणत्याही गरीब किंवा गरजू व्यक्तीला दान करा. तुम्हाला हवे असल्यास या तेलाचा दिवा लावून शनिदेवाच्या मंदिरात ठेवू शकता. असे केल्याने आरोग्यासही फायदे होतील.

हे सुद्धा वाचा

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI