Shitala Ashtami 2023 : आज शितला अष्टमी, जाणून घ्या पुजा विधी आणि महत्त्व

असे मानले जाते की या दिवशी माता शितलाची पूजा केल्याने ती महामारीपासून लोकांचे रक्षण करते.

Shitala Ashtami 2023 : आज शितला अष्टमी, जाणून घ्या पुजा विधी आणि महत्त्व
शितला अष्टमी
Image Credit source: Social Media
| Updated on: Mar 15, 2023 | 9:13 AM

मुंबई : होळीनंतर शितला अष्टमी (Shitala Ashtami) साजरी केली जाते. याला काही ठिकाणी बसोडा पूजा असेही म्हणतात. बसोडा म्हणजे शिळे. या दिवशी शिळे अन्न खाण्याचे महत्त्व आहे. याशिवाय नैवेद्य म्हणून शिळे अन्न अर्पण केले जाते. या दिवशी शीतला मातेची पूजा केल्याने अनेक प्रकारच्या रोगांमध्ये लाभ होतो. असे मानले जाते की या दिवशी माता शितलाची पूजा केल्याने ती महामारीपासून लोकांचे रक्षण करते. यावर्षी शीतला सप्तमीला 14 मार्चला तर शीतला अष्टमीला 15 मार्चला म्हणजे आज पूजा केली जाणार आहे. या पूजेचे दिवस आणि परंपरा सर्वत्र भिन्न आहेत.

पूजेचा मुहूर्त

शितला अष्टमीच्या पूजेचा शुभ मुहूर्त बुधवार, 15 मार्च 2023 रोजी सकाळी 6:31 ते संध्याकाळी 6:29 पर्यंत असेल.
अष्टमी तिथी 14 मार्च 2023 रोजी रात्री 8:22 वाजता सुरू होईल.
शितला अष्टमीची समाप्ती तारीख 15 मार्च 2023 संध्याकाळी 6.45 वाजता आहे.

शितला अष्टमीची पूजा पद्धत

धार्मिक मान्यतेनुसार शीतला अष्टमीच्या दिवशी घरात गॅस लावणे टाळावे. या दिवशी शिळे अन्न खावे व त्याचाच नैवेद्य दाखवावा. शीतला अष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून पूजेचे ताट तयार करावे. ताटात दही,  पोळी, बाजरी, सप्तमीला केलेला गोड भात घ्यावा.

शीतला मातेच्या मंदिरात जाऊन पूजा करावी. शितला मातेची पुजा करावी. पूजेनंतर मंदिरात हात जोडून शीतला मातेला सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करा. घरी आल्यावर कु़टूंबातील सदस्यांना प्रसाद द्यावा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)