Shrawan 2022: श्रावणात घरीच करायची असेल शिवलिंगाची पूजा तर जाणून घ्या पूजेचा विधी आणि नियम

श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. यंदा सावन महिना 14 जुलैपासून सुरू होऊन 12 ऑगस्टला संपेल. 18 जुलै रोजी सावन महिन्याचा पहिला सोमवार येतो. अनेकजण श्रावणात शिवलिंगाची स्थापना करतात. व  त्याची पूजा करतात. धार्मिक मान्यतेनुसार या काळात केलेली पूजा खूप लाभदायक असते. घरामध्ये शिवलिंगाची पूजा करण्याचे विशेष नियम आहेत. चला जाणून […]

Shrawan 2022: श्रावणात घरीच करायची असेल शिवलिंगाची पूजा तर जाणून घ्या पूजेचा विधी आणि नियम
श्रावण सोमवार व्रत
नितीश गाडगे

|

Jul 02, 2022 | 12:46 PM

श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. यंदा सावन महिना 14 जुलैपासून सुरू होऊन 12 ऑगस्टला संपेल. 18 जुलै रोजी सावन महिन्याचा पहिला सोमवार येतो. अनेकजण श्रावणात शिवलिंगाची स्थापना करतात. व  त्याची पूजा करतात. धार्मिक मान्यतेनुसार या काळात केलेली पूजा खूप लाभदायक असते. घरामध्ये शिवलिंगाची पूजा करण्याचे विशेष नियम आहेत. चला जाणून घेऊया घरात शिवलिंग स्थापन करण्याचे नियम आणि पूजा पद्धती.

शिवलिंगाचा आकार महत्त्वाचा

शास्त्रानुसार घरामध्ये स्थापित करावयाच्या शिवलिंगाचा आकार लहान असावा. घरामध्ये अंगठ्याच्या आकाराचे शिवलिंग स्थापित करणे चांगले. याशिवाय शिवलिंग एकटे ठेवू नये. शिव परिवाराचा फोटो जरूर ठेवावा.

जलधारा असलेले शिवलिंग

शास्त्रानुसार शिवलिंगातून नेहमी ऊर्जेचा संचार होत असतो. त्या उर्जेचा प्रवाह संतुलित ठेवण्यासाठी शिवलिंगाला जल अर्पण केले जाते. शिवलिंगाची उर्जा शांत ठेवण्यासाठी पाणी असणे आवश्यक आहे.

shiv puja

शिवलिंग या दिशेला ठेवावे

घरामध्ये शिवलिंगाची स्थापना अशा प्रकारे करावी की, पाण्याचा प्रवाह उत्तर दिशेला असेल. त्याचबरोबर घरात एकच शिवलिंग स्थापन करावे. एकापेक्षा जास्त शिवलिंगांची स्थापना करणे अशुभ मानले जाते. यासोबतच शिवलिंगाची नित्य पूजा करणे आवश्यक आहे. रोज घरात स्थापित शिवलिंगाची पूजा केल्याने विशेष लाभ होतो.

श्रावण सोमवारचे व्रत

श्रावण महिन्यात शास्त्रानुसार सोमवारी तीन प्रकारचे व्रत करतात. सोमवार, सोळा सोमवार आणि सौम्य प्रदोष. सोमवार व्रताची विधी सर्व व्रतांप्रमाणेच असते. या व्रताची सुरूवात श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारपासून केली जाते. श्रावण महिना भगवान शंकराला प्रिय असण्यामागचे कारण म्हणजे या महिन्यात देवी पार्वतीने भगवान शंकरांना प्राप्त करण्यासाठी मोठे तप केले होते. श्रावणी सोमवारी देशभरातील शिवमंदिरांमध्ये भाविकांची रीघ लागलेली असते. महादेव शिवशंकरावर या दिवशी जलाभिषेक, दुग्धाभिषेक, रुद्राभिषेक मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्याचप्रमाणे प्रत्येक सोमवारी महादेवावर वाहिल्या जाणाऱ्या शिवामूठीचे महत्त्वही वेगळे आहे. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मुग आणि चौथ्या सोमवारी जव शिवामूठ म्हणून वाहण्याची पद्धत आहे. श्रावण महिन्यात पाचवा सोमवार आल्यास शिवामूठ म्हणून सातू वाहण्याची परंपरा आहे.

हे सुद्धा वाचा

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें