AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shrawan Purnima 2023 : पौर्णिमा तिथीला का केले जाते नदीत स्नान? असे आहे धार्मिक महत्त्व

यंदा श्रावण पौर्णिमा 30 ऑगस्टला सुरू होणार असून ती 31 ऑगस्टच्या सकाळपर्यंत चालेल. हिंदू कॅलेंडरनुसार श्रावण महिन्यातील पौर्णिमेला श्रावणी पौर्णिमा म्हणतात. श्रावण पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधनाचा सणही साजरा केला जातो.

Shrawan Purnima 2023 : पौर्णिमा तिथीला का केले जाते नदीत स्नान? असे आहे धार्मिक महत्त्व
गंगा स्नानImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Aug 24, 2023 | 1:34 PM
Share

मुंबई : हिंदू धर्मात पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी स्नान आणि दान केल्याने पुण्य प्राप्त होते. तर पौर्णिमेच्या (Shrawan Purnima 2023) दिवशी पिंडदान केल्याने पितरांचे आशीर्वाद प्राप्त होतात. यंदा श्रावण पौर्णिमा 30 ऑगस्टला सुरू होणार असून ती 31 ऑगस्टच्या सकाळपर्यंत चालेल. हिंदू कॅलेंडरनुसार श्रावण महिन्यातील पौर्णिमेला श्रावणी पौर्णिमा म्हणतात. श्रावण पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधनाचा सणही साजरा केला जातो. या दिवशी बहिणी आपल्या भावाला राखी किंवा रक्षासूत्र बांधतात आणि भाऊ आपल्या बहिणीचे आयुष्यभर रक्षण करण्याचे वचन देतो. श्रावण पौर्णिमेने हिंदी भाषीकांच्या श्रावण महिन्याचीही समाप्ती होणार आहे.

पौर्णिमेच्या दिवशी स्नान आणि दानाचे महत्त्व

श्रावण पौर्णिमेच्या दिवशी विविध तीर्थक्षेत्रांवर स्नान व दान करण्याची परंपरा आहे. कोणत्याही पौर्णिमेच्या दिवशी स्नान आणि दान केल्याने लोकांच्या जीवनातील समस्या दूर होतात आणि जीवन आनंदी होते. मात्र तिर्थक्षेत्री जाणे तुमच्यासाठी शक्य नसल्यास स्नानाच्या पाण्यात गंगेच्या पाण्याचे काही थेंब टाकून तुम्ही घरीच स्नान करू शकता आणि गरजूंना काही दान करू शकता. धार्मिक मान्यतेनुसार श्रावण पौर्णिमेच्या दिवशी तर्पण किंवा पिंडदान केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि पितृदोषही दूर होतो. यासोबतच सर्व प्रकारचे ग्रह दोषही दूर होतात.

श्रावण पौर्णिमा 2023 तारीख आणि शुभ वेळ

श्रावण महिन्याच्या पौर्णिमेची सुरुवात – 30 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 10:58 पासून श्रावण महिन्याची पौर्णिमा समाप्ती – 31 ऑगस्ट 2023 सकाळी 7.5 वाजता

पौर्णिमेच्या दिवशी हे प्रभावी उपाय अवश्य करा

  • वैवाहिक जीवनात समस्या असल्यास या दिवशी पती-पत्नीने चंद्राला दूध अर्पण करावे. यामुळे त्यांच्या आयुष्यात येणारी प्रत्येक लहान-मोठी समस्या दूर होते. हा उपाय पती किंवा पत्नी दोघेही करू शकतात. हा उपाय केल्याने वैवाहिक जीवनात शांती राहते.
  • बऱ्याचदा अथक प्रयत्नानंतरही कामं पुर्ण होत नाही, तुमच्यासोबतही असे होत असल्यास या दिवशी विहिरीत चमच्याने दूध टाकावे. असे मानले जाते की हा उपाय केल्याने भाग्य उजळते. तुमच्या कोणत्याही महत्त्वाच्या कामात काही अडथळे येत असतील तर तेही या उपायाने दूर होतील.
  • कुंडलीत काही ग्रहदोष असल्यास ते दूर करण्यासाठी या दिवशी पिंपळ आणि कडुनिंबाच्या झाडाखाली विष्णु सहस्त्रनाम किंवा शिवाष्टकांचे पठण करावे. यामुळे ग्रह दोष दूर होतात आणि शुभ परिणाम मिळू लागतात.
  • ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी  लक्ष्मीच्या फोटोसमोर 11 रूपये ठेवावे आणि त्यावर हळदीचा टिळा लावावा. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांला लाल कपड्यात बांधा आणि तुमच्या तिजोरीत ठेवा. असे केल्याने आर्थिक स्थिती सुधारते.
  • पौर्णिमेच्या दिवशी पांढरे वस्त्र, साखर, तांदूळ, दही, चांदीच्या वस्तू आणि मोती दान केल्याने कुंडलीतील चंद्राची स्थिती सुधारते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?