AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shrawan Putrada Ekadashi : रविवारी आहे श्रावण पुत्रदा एकादशी, या पाच राशीच्या लोकांचे भाग्य चकाकणार

हिंदू कॅलेंडरनुसार, श्रावण पुत्रदा एकादशीचे व्रत यावेळी 27 ऑगस्ट 2023 रोजी रविवारी पाळले जाईल. दर महिन्याला 2 एकादशी असतात. एक एकादशीचे व्रत शुक्ल पक्षात पाळले जाते, तर दुसरे एकादशीचे व्रत कृष्ण पक्षात पाळले जाते.

Shrawan Putrada Ekadashi : रविवारी आहे श्रावण पुत्रदा एकादशी, या पाच राशीच्या लोकांचे भाग्य चकाकणार
पुत्रदा एकादशीImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Aug 25, 2023 | 11:29 AM
Share

मुंबई : हिंदू धर्मात, श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला पुत्रदा एकादशीचा (Shrawan Putrada Ekadashi) उपवास केला जातो. हे व्रत नियमानुसार पाळल्यास इच्छुक व्यक्तीला संतान प्राप्ती होते आणि जीवनात प्रगती होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. पुत्रदा एकादशीला भारतातील विविध राज्यांमध्ये पवित्रोपण किंवा पवित्र एकादशी असेही म्हणतात. हिंदू कॅलेंडरनुसार, श्रावण पुत्रदा एकादशीचे व्रत यावेळी 27 ऑगस्ट 2023 रोजी रविवारी पाळले जाईल. विशेष म्हणजे हिंदू कॅलेंडरनुसार दर महिन्याला 2 एकादशी असतात. एक एकादशीचे व्रत शुक्ल पक्षात पाळले जाते, तर दुसरे एकादशीचे व्रत कृष्ण पक्षात पाळले जाते. अशा प्रकारे वर्षभरात 24 एकादशी व्रत असतात, मात्र जेव्हा अधिक महिना असतो तेव्हा 26 एकादशी येतात. श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशीला पौराणिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे, कारण ही एकादशी संततीचे वरदान देणारी मानली जाते.  हे व्रत केल्याने भगवान शिव आणि विष्णू दोघांचीही कृपा होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.

या राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळतील

  1. मेष – धार्मिक प्रवासाला जाता येईल. अध्यात्मिक कार्यात रुची वाढेल. धनसंपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. तीर्थयात्रेला जाण्याचा  योग आहे. पती पत्नीच्या नात्यात गोडवा येईल. मुलांच्या शेक्षणीक प्रगतीमुळे समाधानी राहाल.
  2. वृषभ – कार्यक्षेत्रात प्रगती होईल. नोकरीमध्ये बदल लाभदायक ठरतील. नवीन कामाची जबाबदारी मिळेल. महत्त्वाच्या लोकांशी गाठीभेटी होतील. व्यवसायात तेजी अनुभवाल. अडकलेला पैसा प्राप्त होईल. भागीदारीच्या व्यवसायात लाभ होईल. कुटुंबात शुभ कार्य होतील.
  3. सिंह- अचानक धनलाभ होईल. थांबलेले पैसे मिळतील. कोर्टाच्या प्रकणात निकाल तुमच्या बाजुने लागेल. वडिलोपार्जीत मालमत्तेतून लाभ संभवतो. जुन्या ओळखीतून लाभ होणार आहे. व्यवसायात गुंतवणूक फायदेशीर ठरेल.
  4. धनु – या काळात नशीबाची साथ मिळेल. जमीन, इमारत किंवा वाहन खरेदी करू शकता. कर्जाच्या फेऱ्यातून सुटका होईल. कुटूंबामध्ये सुरू असलेला तणाव चर्चा करून सुटेल.
  5. मीन- चांगली बातमी मिळू शकते. नोकरीत प्रगती होईल. धार्मिक आणि सामाजीक कार्यात रूची वाढेल. मान सन्मानात वृद्धी होईल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?