
हिंदू धर्मामध्ये स्कंद षष्ठीचा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो. स्कंद षष्ठीच्या दिवशी महादेवचे पुत्र भगवान कार्तिकेय यांची पूजा केली जाते. हा दिवस कार्तिकेय यांना समर्पित आहे. प्रत्येक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या षष्ठी तिथीला स्कंद षष्ठीची पूजा केली जाते. स्कंद षष्ठीच्या दिवशी भगवान कार्तिकेयची पूजा विशेष पद्धतीनं केल्याने भक्तांच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात. त्यासोबतच तुमच्या आयुष्यामध्ये सुख शांती आणि समृद्धी येते. कार्तिकेय भगवान यांच्या भक्तांसाठी स्कंद षष्ठीचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवळी कार्तिकेय यांची पूजा नियमित केल्यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि हा दिवस शक्ती, विजय आणि धैर्याचे प्रतीक आहे.
पंचांगानुसार, फाल्गुन महिन्यातील षष्ठी तिथी मंगळवार, 4 मार्च रोजी दुपारी 3:16 वाजता सुरू झाली आहे आणि ती दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवार, 5 मार्च रोजी दुपारी 12:51 वाजता संपेल. अशा परिस्थितीत, फाल्गुन महिन्यातील षष्ठी तिथीचे व्रत 4 मार्च ते 5 मार्च पर्यंत या काही विशेष गोष्टींचा दान केल्यामुळे तुमच्या आयुष्यामधील सर्वात महत्त्वाच्या गोष्टी पूर्ण होण्यास मदत होते. स्कंद षष्ठीच्या दिवशी तुमचे विचार सकारात्मक ठेवा.
या गोष्टी दान करा…..
स्कंद षष्ठीच्या दिवशी फळांचे दान केल्याने आरोग्य लाभते आणि देवता प्रसन्न होतात.
दूध दान केल्याने ज्ञान आणि बुद्धिमत्ता वाढते.
दही दान केल्याने वय आणि आरोग्य वाढते.
गरिबांना अन्नधान्य दान केल्याने अन्नपूर्णाचे आशीर्वाद मिळतात.
गरिबांना कपडे दान केल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी येते.
तीळ दान केल्याने पूर्वजांना शांती मिळते आणि मोक्ष मिळतो.
गूळ आणि तूप दान केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते.
पाणी दान करणे देखील खूप शुभ मानले जाते. तुम्ही तहानलेल्या लोकांना पाणी देऊ शकता किंवा सार्वजनिक ठिकाणी पाण्याचे स्टॉल लावू शकता.
गरिबांना ब्लँकेट दान केल्याने विशेष पुण्य मिळते.
या गोष्टी लक्षात ठेवा.
दान करताना नेहमीच श्रद्धा आणि भक्तीची भावना असावी.
दान नेहमी गरजूंना दिले पाहिजे.
दान करताना कोणत्याही प्रकारचा अहंकार बाळगू नये.
दान नेहमी गुप्तपणे केले पाहिजे.
स्कंद षष्ठीचे महत्त्व
स्कंद षष्ठीच्या दिवशी भगवान कार्तिकेयची पूजा केल्याने भक्तांच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात असे मानले जाते. हे व्रत आपल्याला क्रोध, लोभ, अहंकार आणि वासना यासारख्या वाईट गोष्टींवर मात करण्यास मदत करून चांगले आणि आनंदी जीवन जगण्याची प्रेरणा देते. पौराणिक शास्त्रांनुसार, स्कंद षष्ठीच्या दिवशी स्वामी कार्तिकेय यांनी तारकासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता, म्हणून या दिवशी भगवान कार्तिकेयांची पूजा केल्याने जीवनात उच्च योगाची चिन्हे प्राप्त होतात.