Snake Ring : सापाच्या आकाराची अंगठी घातल्याने नशीब बदलतं? ती कोणत्या बोटात घालावी; काय सांगतं ज्योतिषशास्त्र?

Snake Ring Benefits : ज्योतिषशास्त्रानुसार सापाच्या आकाराची अंगठी सुख-समृद्धी, सकारात्मक ऊर्जा आणि ग्रहदोष कमी करण्यासाठी लाभदायक मानली जाते. ही अंगठी कोणत्या बोटात आणि कोणत्या धातूची घालावी याबाबत जाणून घेऊयात.

Snake Ring : सापाच्या आकाराची अंगठी घातल्याने नशीब बदलतं? ती कोणत्या बोटात घालावी; काय सांगतं ज्योतिषशास्त्र?
Snake Ring
Image Credit source: AI
| Updated on: May 16, 2026 | 5:35 PM

तुमच्यापैकी अनेकांनी एखाद्याच्या हातात सापाच्या आकाराची अंगठी पाहिली असेल. अनेकांनी अशी अंगठी घालण्याची इच्छाही झाली असेल. मात्र अनेकांच्या मनात असाही प्रश्न आला असेल की ही अंगठी घातल्याने काय फायदे होतातय़ ज्योतिषशास्त्रानुसार सापाच्या आकाराच्या अंगठीचे अनेक फायदे आहेत, मात्र प्रत्येक व्यक्तीसाठी ही अंगठी लाभदायक नसते. चुकीच्या व्यक्तीने आणि चुकीच्या बोटात घातल्यास या अंगठीचे उटल परिणामही जाणवू शकतात. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

सुख-समृद्धीचे प्रतीक

ज्योतिषशास्त्रात सापाच्या आकाराची अंगठी खूप शुभ मानली जाते. असे मानल जाते की ही अंगठी बोटात घातल्यास जीवनात सुख, शांती आणि सकारात्मकता टिकून राहते. अंगठी घालणाऱ्या व्यक्तींना जीवनात सुख-समृद्धी लाभते. त्यांच्या आयुष्यात धनधान्याची कमतरता भासत नाही आणि अनेक अडचणी आपोआप दूर होतात. त्यामुळे अनेकजण ही अंगठी घालतात.

वाईट गोष्टींपासून संरक्षण

ज्योतिषतज्ज्ञांच्या मते, योग्य विधी आणि सल्ल्यानुसार सापाच्या आकाराची अंगठी घातल्यास नकारात्मक ऊर्जा आणि वाईट नजरेपासून संरक्षण मिळू शकते. या अंगठीमुळे प्रगती, संपत्ती आणि आनंदी जीवनावर इतरांच्या वाईट नजरेचा परिणाम होत नाही.

ग्रहण दोषाचा प्रभाव कमी होतो

अनेक लोकांच्या नजरेत ग्रहण दोष असतो, त्यामुळे त्यांच्या आयुष्यात अनेक अडचणी असतात. असे लोक ज्योतिषतज्ज्ञांच्या सल्ल्याने सापाच्या आकाराची अंगठी घालू शकतात. उजव्या हाताच्या मधल्या बोटात ही अंगठी घातल्यास ग्रहण दोषाचा प्रभाव कमी होऊ शकतो, असे मानले जाते.

आरोग्यासाठीही फायदेशीर

कुंडलीतील ग्रहस्थिती बिघडल्यामुळे काही लोकांचे आरोग्य बिघडते. सतत आजारी असल्यासारखे वाटणे किंवा मानसिक अस्वस्थता जाणवतात. या काळात सापाच्या आकाराची अंगठी लाभदायक ठरू शकते. मात्र, ही अंगठी नेहमी तज्ज्ञांच्या सल्ल्यानंतरच धारण करावी. यामुळे मानसिक आणि भावनिक संतुलन राखण्यास मदत मिळते.

कोणत्या धातूची अंगठी योग्य?

कोणत्या धातूची अंगठी घालावी असा प्रश्न अनेकांना पडला असेल. मात्र सापाच्या आकाराची अंगठी चांदीची असणे सर्वात उत्तम मानले जाते. मात्र काही लोकांना ज्योतिषतज्ज्ञ कांस्य किंवा तांब्याची अंगठी घालण्याचाही सल्ला देतात. यामुळे जीवनात सकारात्मक ऊर्जा वाढते.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us