AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Solar Eclipse : सर्वपितृ अमावस्येला लागणार दूसरे सूर्य ग्रहण, श्राद्ध करू शकणार की नाही?

ग्रहण काळात पूजा, पठण, शुभ कार्ये होत नाहीत. आता अशा परिस्थितीत सर्वपितृ अमावस्येला लोकं श्राद्ध करू शकतील की नाही? या बद्दल जाणून घेऊया.

Solar Eclipse : सर्वपितृ अमावस्येला लागणार दूसरे सूर्य ग्रहण, श्राद्ध करू शकणार की नाही?
सर्वपितृ अमावस्याImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Aug 31, 2023 | 10:32 PM
Share

मुंबई : पितृपरीक्षा ही पितरांना समर्पित आहे. यंदा पितृपक्षातच (Sarvapitu Amavasya)  वर्षातील दुसरे सूर्य ग्रहण (second Solar Eclipse) होणार आहे. वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण 14 ऑक्टोबर 2023 रोजी सर्वपितृ अमावस्येला होणार आहे. शास्त्रामध्ये सूर्यग्रहण अशुभ मानले गेले आहे कारण ग्रहणातून निघणारी नकारात्मक ऊर्जा प्रभावीत करते. ग्रहण काळात पूजा, पठण, शुभ कार्ये होत नाहीत. आता अशा परिस्थितीत सर्वपितृ अमावस्येला लोकं श्राद्ध करू शकतील की नाही, सूर्यग्रहण कधी होईल हे जाणून घेऊया.

सर्वपितृ अमावस्येला सूर्यग्रहणाची वेळ

14 ऑक्टोबर 2023 रोजी अश्विन अमावस्या म्हणजेच सर्वपित्री अमावस्या, वर्षातील दुसरे सूर्यग्रहण रात्री 8:34 पासून सुरू होईल आणि मध्यरात्री 2:25 वाजता संपेल. हे कंकणाकृती सूर्यग्रहण असेल जे कन्या आणि चित्रा नक्षत्रात होईल. तथापि, ते भारतात दिसणार नाही, म्हणून त्याचा सुतक कालावधी पाळला जाणार नाही.

सर्वपितृ अमावस्या श्राद्ध करता येणार?

हिंदू धर्मानुसार, जर कोणत्याही कारणास्तव या तिथीला तुम्ही तुमच्या पितरांचे श्राद्ध करू शकत नसाल, तर सर्वपितृ अमावस्येला तुम्ही पिंडदान  करू शकता, यामुळे त्यांना समाधान मिळते आणि ते तुमच्यावर प्रसन्न होतात. या दिवशी सूर्यग्रहण रात्री होत असून श्राद्ध विधी दुपारी केले जातात, त्यामुळे सूर्यग्रहणाचा कोणताही परिणाम होणार नाही. या दिवशी तुम्ही कोणत्याही अडथळ्याशिवाय तर्पण आणि पिंडदान करू शकता.

कुठे दिसणार सूर्यग्रहण?

जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मधून जातो तेव्हा त्याला सूर्यग्रहण म्हणतात. क्युबा, बार्बाडोस, पेरू, यूएसए, अर्जेंटिना, कॅनडा, मेक्सिको, हैती, बहामास, अँटिग्वा, ब्रिटिश व्हर्जिन आयलंड, जमैका, पॅराग्वे, ग्वाटेमाला, ब्राझील, कोलंबिया, उरुग्वे, डोमिनिकन, यांसारख्या ठिकाणी वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण पाहायला मिळेल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंच
Vikas Lavande : अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंचा मोठा दावा
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप,
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप, न्यायालयात जाणार!
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट....
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट एकनाथ शिंदेंकडे मांडली तक्रार!
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरण...
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान नेमका कोणाला दिला इशारा?
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला...
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला विक्रमी भाव, शेतकऱ्यांना दिलासा!
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड...
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड होताच पहिली प्रतिक्रिया
महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड...
Gokul Milk Union Big Update : महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले, आज उद्धव ठाकरे...
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणा
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणार? हसन मुश्रीफांचं मोठं विधा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य....
NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य करण्याचा अधिकार केवळ...; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?