AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सूर्यग्रहणाच्या पार्श्वभूमीवर ‘या’ राज्यात शाळांना सुट्टी जाहिर, 8 एप्रिलला दिवसा होणार अंधार, प्रशासनाकडून..

Solar eclipse : यंदाच्या वर्षातील पहिले आणि मोठे सूर्यग्रहण उद्या आहे. हा दिवस अत्यंत मोठा नक्कीच आहे. आता प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. हेच नाही तर काही भागातील शाळांना सुट्टी देखील जाहिर करण्यात आलीये. सूर्यग्रहण बघण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात घराच्या बाहेर पडण्याचीही शक्यता आहे.

सूर्यग्रहणाच्या पार्श्वभूमीवर 'या' राज्यात शाळांना सुट्टी जाहिर, 8 एप्रिलला दिवसा होणार अंधार, प्रशासनाकडून..
Solar eclipse
Updated on: Apr 07, 2024 | 12:19 PM
Share

8 एप्रिल हा दिवस अत्यंत मोठा आहे. हेच नाही तर यादिवशी दिवसा काही काळ पूर्ण अंधार पडणार आहे. 8 एप्रिलला चैत्र महिन्यातील अमावस्येच्या दिवशी संपूर्ण सूर्यग्रहण होईल. वर्षातील पहिले सूर्यग्रहण चैत्र अमावस्येला होणार आहे. हे सूर्यग्रहण अमावस्याच्या दिवशी बराच वेळ चालेल. सुमारे 5 तास 25 मिनिटे हे सूर्यग्रहण असेल. वर्षाच्या पहिल्या सूर्यग्रहणात अनेक प्रकारचे दुर्मिळ योगही तयार होतील. यामुळे काही मिनिटे दिवसा काळोखा होईल. हेच नाही तर काही ठिकाणी तर शाळांना सुट्टया देखील जाहिर करण्यात आल्या आहेत.

तब्बल 50 वर्षांनी असा योग्य आल्याचे देखील सांगितले जातंय. प्रशासनाकडून खबरदारी देखील घेतली जात असल्याचे सांगितले जातंय. सूर्यग्रहणात सूर्य दिवसा चंद्राला पूर्णपणे झाकतो आणि दिवसा अंधार होतो. यामुळे अनेक राज्यात शाळांना सुट्ट्या जाहिर करण्यात आल्या आहेत. या सूर्यग्रहणाचा भारतामध्ये फार काही परिणाम होणार नाहीये.

हे सूर्यग्रहण जरी 5 तास 25 मिनिटे चालणार आहे आणि सात मिनिटे अजिबातच सूर्य दिसणार नाहीये, म्हणजेच सात मिनिटे दिवसा पूर्ण काळोखा होईल. 8 एप्रिलला होणाऱ्या सूर्यग्रहणाबद्दल जगभरातील लोकांमध्ये उत्साह बघायला मिळतोय. उत्तर अमेरिकेच्या काही भागात संपूर्ण सूर्यग्रहण दिसेल आणि सात मिनिटे ते नऊ सेकंद पूर्ण अंधार होईल.

या सूर्यग्रहणामुळे उत्तर अमेरिकेच्या अनेक भागांमध्ये 8 एप्रिलला शाळांना सुट्ट्या जाहिर करण्यात आल्या आहेत. हे सूर्यग्रहण कॅनडा, उत्तर अमेरिकेपासून मेक्सिकोपर्यंत दिसणार आहे. हेच नाही तर नासाचे शास्त्रज्ञ या सूर्यग्रहणाच्या काळात अनेक प्रयोग करणार आहेत. भारताच्या कोणत्याच भागामध्ये हे सूर्यग्रहण दिसणार नाहीये.

हे सूर्यग्रहण पाहण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात घराच्या बाहेर पडणार असल्याने प्रशासनाकडून उपायोजना केल्या जात आहेत. सूर्यग्रहण थेट डोळ्यांनी बघणे टाळा असेही तज्ज्ञांनी सांगितले आहे. यामुळे आपल्या डोळ्यांचे नुकसान होऊ शकते आणि डोळे खराब होऊ शकतात. भारतासह इतर देशांमध्ये हे सूर्यग्रहण दिसणार नसल्याचे स्पष्ट सांगण्यात आले आहे.

अजित पवार आणि धनंजय मुंडेंच्या वाढदिवसाच्या बॅनरवर वाल्मिक कराडचा फोटो
अजित पवार आणि धनंजय मुंडेंच्या वाढदिवसाच्या बॅनरवर वाल्मिक कराडचा फोटो.
पक्षाचं नाव कोणत्याही येड्या गबाळ्याला द्यायचं हे.., - उद्धव ठाकरे
पक्षाचं नाव कोणत्याही येड्या गबाळ्याला द्यायचं हे.., - उद्धव ठाकरे.
महाराष्ट्रात लवकरच धर्मांतरविरोधी कायदा येणार
महाराष्ट्रात लवकरच धर्मांतरविरोधी कायदा येणार.
आरोपीला व्हीआयपी ट्रि्टमेंट मिळतेय; प्रवीण गायकवाड यांचा गंभीर आरोप
आरोपीला व्हीआयपी ट्रि्टमेंट मिळतेय; प्रवीण गायकवाड यांचा गंभीर आरोप.
चड्डी-बनियानने अधिवेशन गाजवलं! आदित्य ठाकरे-नीलेश राणेंमध्ये जुंपली
चड्डी-बनियानने अधिवेशन गाजवलं! आदित्य ठाकरे-नीलेश राणेंमध्ये जुंपली.
पैशांची खूप मस्ती आली का? तुला..; भाजप आमदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल
पैशांची खूप मस्ती आली का? तुला..; भाजप आमदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल.
चड्डी, बनियन गँग उघडी-नागडी फिरतेय, त्यांना..; अनिल परबांची टीका
चड्डी, बनियन गँग उघडी-नागडी फिरतेय, त्यांना..; अनिल परबांची टीका.
परमीट रुम्स, बार बंद, ड्राय डेमुळे तळीरामांचा वांधा
परमीट रुम्स, बार बंद, ड्राय डेमुळे तळीरामांचा वांधा.
जयंत पाटलांनी राजीनामा दिला नाही? सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा
जयंत पाटलांनी राजीनामा दिला नाही? सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा.
सुप्रीम कोर्टाकडून उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा
सुप्रीम कोर्टाकडून उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा.