Som Pradosh Vrat 2021 | महादेवाला प्रसन्न करण्यासाठी सोम प्रदोष व्रताला हे उपाय करा

| Updated on: Jun 06, 2021 | 12:53 PM

प्रदोष व्रताला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे (Som Pradosh Vrat 2021). या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा केली जाते. प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या दोन्ही पक्षांच्या त्रयोदशी तिथीला पाळला जातो.

Som Pradosh Vrat 2021 | महादेवाला प्रसन्न करण्यासाठी सोम प्रदोष व्रताला हे उपाय करा
Som Pradosh Vrat
Follow us on

मुंबई : प्रदोष व्रताला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे (Som Pradosh Vrat 2021). या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा केली जाते. प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या दोन्ही पक्षांच्या त्रयोदशी तिथीला पाळला जातो. या दिवशी उपवास केल्याने कुंडलीतील शनि प्रदोषचा प्रभाव कमी होतो. यावेळी प्रदोष व्रत सोमवार 7 जून रोजी आहे, म्हणूनच या प्रदोष व्रताला सोम प्रदोष व्रत म्हणतात (Som Pradosh Vrat 2021 Do These Upay On This Auspicious Day).

सोम प्रदोषच्या दिवशी व्रताचे पूजन केल्याने आर्थिक समस्या दूर होते. शुभ परिणाम प्राप्त करण्यासाठी या दिवशी कोणते उपाय केले जावे पाहुयात –

? सोम प्रदोष व्रताच्या दिवशी उपासनेचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी दुधामध्ये गूळ मिसळून भगवान महादेवाचा अभिषेक करावा. यामुळे घरात संपत्ती वाढण्याची शक्यता निर्माण होते.

? सोम प्रदोषच्या दिवशी संध्याकाळी भगवान शिवची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी उपवास ठेवल्यास एखाद्याला अशुभ परिणामांपासून मुक्तता मिळते. जर एखादी व्यक्ती मुंगा धारण करायचा विचार करत असेल तर हा सर्वोत्तम दिवस आहे.

? आपण कोणत्याही प्रकारच्या आजाराने ग्रस्त असल्यास महामृत्युंजय मंत्राचा 108 वेळा जप करा. या मंत्रांचा जप केल्याने सर्व समस्या दूर होतील. असे केल्याने तुम्ही निरोगी व्हाल.

? सोम प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान महादेवाला कच्च्या दुधाने अभिषेक करावा. याशिवाय, या दिवशी शिव महिम्नस्तोत्राचा जप केल्याने शुभ परिणाम मिळतात.

सोम प्रदोष व्रताचे महत्त्व

सोम प्रदोष व्रताची उपासना केल्याने एखाद्या व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. ज्या लोकांच्या कुंडलीत चंद्राचा वाईट प्रभाव असेल, त्यांनी भक्ती आणि नियमांनी उपवास ठेवावा. याशिवाय हा उपवास संतान होण्यासाठीही खूप महत्वाचा आहे.

शुभ मुहूर्त –

सोम प्रदोष व्रताची सुरुवात – 07 जून रोजी सकाळी 8 वाजून 47 मिनिटांपर्यंत

सोम प्रदोष व्रत समाप्त – 08 जून रोजी रात्री 11 वाजून 24 मिनिटांनी

पूजेचा शुभ मुहूर्त – 07 जून रोजी संध्याकाळी 7 वाजून 17 मिनिटांपासून ते संध्याकाळी 9 वाजून 18 मिनिटांपर्यंत असेल.

Som Pradosh Vrat 2021 Do These Upay On This Auspicious Day

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Som Pradosh Vrat 2021 | आज सोम प्रदोष व्रत, जाणून घ्या शुभ मुहूर्त, व्रत आणि महादेवाच्या पूजेचं महत्व

Apara Ekadashi 2021 : धन आणि पुण्य देणारी अपरा एकादशी, आर्थिक समस्या दूर करण्यासाठी हे उपाय करा