AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Somwati Amavasya 2023 : पितृदोष दूर करण्यासाठी सोमवती अमावस्या आहे महत्त्वाची, अवश्य करा हे उपाय

पितृदोष दूर करण्यासाठी सोमवती अमावस्येचा दिवस विशेष मानला जातो.  पितरांना शांत करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळविण्यासाठी सोमवती अमावस्येचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो.

Somwati Amavasya 2023 : पितृदोष दूर करण्यासाठी सोमवती अमावस्या आहे महत्त्वाची, अवश्य करा हे उपाय
सोमवती असावस्याImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jul 12, 2023 | 10:28 AM
Share

मुंबई : श्रावण महिन्यातील (Shrawan 2023) अमावास्येला सोमवती अमावस्या म्हणतात. पितृदोष (Pitrudosh Upay) दूर करण्यासाठी सोमवती अमावस्येचा (Somwati Amavasya 2023) दिवस खास आहे. यावर्षी सोमवती अमावस्या सोमवार, 17 जुलै 2023 रोजी येत आहे. तसेच सोमवारी येत असल्याने या दिवशी श्रावण सोमवार व्रत देखील पाळले जाणार आहे. अशाप्रकारे व्रत पाळल्यास दुप्पट फळ मिळण्याची संधी मिळते.

पितरांना प्रसन्न करण्याची संधी

पितृदोष दूर करण्यासाठी सोमवती अमावस्येचा दिवस विशेष मानला जातो.  पितरांना शांत करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळविण्यासाठी सोमवती अमावस्येचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. सोमवती अमावस्येच्या दिवशी स्नान, श्राद्ध, तर्पण, पिंडदान करावे. त्यामुळे पितृदोष दूर होऊन जीवनात येणाऱ्या अडचणी, धनहानी, कष्ट, आजारपण, विवाहातील अडथळे, संततीतील अडथळे इत्यादी दूर होतात.

सोमवार देखील सोमवती अमावस्या दिवशी येत असल्याने या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा विधीपूर्वक करा. यावेळी श्रावणातील अमावस्या तिथी रविवार, 16 जुलै रोजी रात्री 10.08 ते 18 जुलै मध्यरात्री 12.01 पर्यंत असेल. अशा स्थितीत स्नान, दान आणि पूजेचा शुभ मुहूर्त सोमवार, 17 जुलै रोजीच राहील.

सोमवती अमावस्या 2023 रोजी पितृ दोष उपाय

श्रावण अमावस्येच्या दिवशी महादेवाची पूजा केल्यानंतर शिव गायत्री मंत्र – ‘ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय च धीमहि तन्नो रुद्र: प्रचोदयात’. किमान 108 वेळा जप करावा. हा उपाय पूर्ण श्रावण महिन्यात केल्यास उत्तम. पितृदोषासह कुंडलीतील सर्व ग्रह दोष दूर होतील.

सोमवती अमावस्येला सकाळी स्नान करून पिंपळाच्या झाडाची पूजा करा. पिंपळाच्या झाडाच्या मुळास पाणी आणि दूध अर्पण करावे. जाणवे अर्पण करा. तेलाचा दिवा लावा. त्यानंतर पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालताना ‘ओम नमो भगवते वासुदेवाय’ या मंत्राचा जप करा. 108 वेळा पिंपळाच्या झाडाभोवती फिरा. या उपायाने पितृदोष दूर होतो. पूर्वज प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात.

श्रावणातील सोमवती अमावस्येला भगवान शिवाची पूजा करा. त्यानंतर ‘ओम नमः शिवाय’ मंत्राचा उच्चार करताना भोलेनाथला 21 मदार किंवा आक फुले अर्पण करा. यासोबत बेलपत्र, धतुरा, दूध, दही यांनी पूजा करावी. पितृदोष दूर होण्यासाठी भगवान शंकराची प्रार्थना करा. तुमचे सर्व त्रास आणि समस्या दूर होतील.

पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी सोमवती अमावस्येला कुत्रा, गाय, कावळा इत्यादींना भोजन अर्पण करावे. पितृदोषापासून मुक्ती मिळण्यासाठी आणि पितरांचा आशीर्वाद मिळविण्याचा हा सर्वात सोपा उपाय आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी