Spiritual: या विशेष कारणामुळे पूजेत वापरतात कणकीचे दिवे, मिळतो अलभ्य लाभ

तुमची एखादी इच्छा असेल किंवा तुम्हाला कार्यसिद्धी प्राप्त करायची असेल तर कणकेचा दिवा बनवा आणि हनुमान मंदिरात जाऊन  प्रज्वलित करा. यामुळे तुम्हाला हनुमानाची विशेष कृपा प्राप्त होईल.  तुमचे सर्व काम सुरळीतपणे पूर्ण होतील.

Spiritual: या विशेष कारणामुळे पूजेत वापरतात कणकीचे दिवे, मिळतो अलभ्य लाभ
कणकेच्या दिव्यांचे महत्त्व Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jul 30, 2022 | 4:26 PM

हिंदू धर्मात बरीच पूजेमध्ये कणकीचे दिवे वापरण्यात येतात. यामागे नेमके कारण काय आहे आणि त्याचा काय लाभ मिळतो याबद्दल आपण जाणून घेऊया. बऱ्याचदा हनुमानाच्या पूजेत (Hanuman Puja) कणकेच्या दिव्याचा वापर होतो. कणकेचा दिवा इतर दिव्यांच्या तुलनेत अत्यंत पवित्र आणि शुद्ध मानला जातो. मान्यतेनुसार, गव्हाच्या पिठाचा दिवा अतिशय शुभ असतो. तुम्ही पाहिले असेल की शुभ कार्यांमध्ये पुजाऱ्यांकडून कणकेचा दिवा देवासमोर प्रज्वलित करण्यासाठी सांगितले जाते. असे म्हणतात की, कणकेच्या दिव्याने देव प्रसन्न होतात आणि त्यांचे आशीर्वाद मिळतात. विशेषतः हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी तसेच पूजा करताना, कणकेच्या दिव्याला खूप महत्त्व आहे.

दिव्याने पूर्ण होते कार्येसिद्धी

तुमची एखादी इच्छा असेल किंवा तुम्हाला कार्यसिद्धी प्राप्त करायची असेल तर कणकेचा दिवा बनवा आणि हनुमान मंदिरात जाऊन  प्रज्वलित करा. यामुळे तुम्हाला हनुमानाची विशेष कृपा प्राप्त होईल.  तुमचे सर्व काम सुरळीतपणे पूर्ण होतील.

शनी दोषापासून मुक्ती मिळते

मंगळवार किंवा शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घ्या. याशिवाय तुम्ही देवघरातसुद्धा पिठाचा लावू शकता. यामुळे तुमच्या आयुष्यात येणाऱ्या अनेक समस्या दूर होऊ लागतात. यासोबतच शनीची साडेसाती आणि दशेचा अशुभ प्रभावही कमी होतो.

हे सुद्धा वाचा

मंगळ दोषापासून मुक्ती मिळते

मंगळवार हनुमानाचा दिवस मानला जातो आणि मंगळ ग्रहाचा देखील या दिवसाशी संबंधित आहे. कुंडलीतील मंगळाची प्रतिकूल स्थिती तुमच्या जीवनात अनेक समस्या आणू शकते. यासह, त्याचा तुमच्या वैवाहिक जीवनावरही वाईट परिणाम होऊ शकतो. म्हणून, जर तुम्हाला मंगळ ग्रहाला शांत करायचे असेल तर मंगळवारी कणकेच्या दिव्यामध्ये चमेलीचे तेल टाकून दिवा लावा आणि त्यानंतर हनुमान चालीसाचे पठण करा, मग तुमच्या जीवनात येणारे अडथळे दूर होऊ लागतील.

कार्यसिद्धीसाठी

तुम्हाला तुमचे कार्य पूर्ण करायची असेल तर हनुमान मंदिरात पाच मंगळवार कणकेचा पाच तोंडांचा म्हणजेच वातींचा दिवा लावा. असे केल्याने केवळ तुमची इच्छा पूर्ण होत नाही तर कुंडलीत उपस्थित असलेल्या मंगळ दोषाचा प्रभाव देखील कमी होऊ लागतो.

आर्थिक अडचणीतून सुटका मिळवण्यासाठी

जर तुम्ही कर्जामुळे त्रस्त असाल किंवा आर्थिक परिस्थिती ठीक नसेल तर पिठाचा दिवा बनवा आणि त्यात चमेलीचे तेल घाला. वडाच्या मोठ्या पानावर ठेवून प्रज्वलित करा. अशाप्रकारे तुम्ही वडाच्या पाच पानांवर पाच दिवे लावून हनुमानाच्या मंदिरात ठेवा. सलग 11 मंगळवार हे करा. यामुळे तुम्हाला कर्ज आणि पैशाशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळेल.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.