AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Horoscope 10 May 2022 : ध्येय गाठण्यात यशस्वी, ‘या ‘ लोकांसाठी काळ अनुकूल

आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? आजचे तारे काय म्हणतात? दैनिक राशिभविष्यद्वारे आजचे राशीभविष्य आणि संपूर्ण दिवसातील घडामोडींची माहिती जाणून घ्या.

Horoscope 10 May 2022 : ध्येय गाठण्यात यशस्वी, 'या ' लोकांसाठी काळ अनुकूल
Image Credit source: TV9
| Edited By: सिद्धेश सावंत | Updated on: May 10, 2022 | 5:20 AM
Share

मुंबई: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीची रास त्याच्या जन्मतारीख आणि जन्मवेळेवर आधारित असते. ज्योतिषशास्त्रात (Astrology) 27 नक्षत्र, 9 ग्रह आणि 12 राशींचे वर्णन केले आहे. याआधारावर व्यक्तीची रास (Zodiac) ठरवली जाते. आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? आजचे तारे काय म्हणतात? दैनिक राशिभविष्याद्वारे आजचे राशीभविष्य आणि संपूर्ण दिवसातील घडामोडींची माहिती जाणून घेवूया.हे राशीभविष्य (Horoscope) वाचून तुम्ही तुमच्या दैनंदिन योजना यशस्वी करू शकाल. आज तुम्हाला कोणत्या आव्हानां (Challenge)चा सामना करावा लागू शकतो किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात. दैनंदिन राशीभविष्य वाचून तुम्ही परिस्थितीसाठी तयार होऊ शकता.

मकर –

ही वेळ परिक्षेची आहे. पण, तुम्ही तुमचे ध्येय गाठण्यात यशस्वी रहाल. बदलत्या परिस्थितीमुळे तुम्ही तयार केलेल्या योजना फायदेशीर ठरतील. घरातील थोरामोठ्यांचे आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत असतील. आज व्यवसायाशी संबंधित कामे मध्यम राहतील. काही गैरसमजामुळे मोठी ऑर्डर हाताबाहेर जाऊ शकते. कामाच्या ठिकाणी अंतर्गत व्यवस्थेतही काही सुधारणा आणण्याची गरज आहे.

लव फोकस – वैवाहिक जीवनात मधुरता राहील. तारुण्याच्या मस्तीत वेळ वाया घालवू नका. खबरदारी – अनियमित दिनचर्या आणि खाण्याच्या सवयींमुळे आरोग्य बिघडू शकते. आणि याचा परिणाम तुमच्या कामाच्या क्षमतेवरही होईल. शुभ रंग – ऑरेंज भाग्यवान अक्षर – स अनुकूल क्रमांक – 6

कुंभ –

आज सामाजिक किंवा समाजाशी संबंधित कामात वेळ जाईल. तुमच्या बोलण्यालाही महत्त्व दिले जाईल. काळ अनुकूल आहे. तरुणांनी दडलेल्या कलागुणांना समजून घेऊन त्यांना योग्य दिशेने वळवले पाहिजे. कुटुंब आणि जवळच्या नातेवाईकांसोबत थोडा वेळ घालवा. यामुळे नात्यात जवळीक कायम राहील. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी हा काळ योग्य नाही. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीतच समाधानी राहा. कामाच्या ठिकाणी साफसफाई किंवा देखभाल संबंधी कामातही वेळ जाईल. तुमच्या महत्त्वाच्या फाईल्समध्ये डॉक्युमेंट सेव्ह करा. कारण तुमच्या महत्त्वाच्या गोष्टींची काळजी स्वतः घेणे गरजेचे आहे.

लव फोकस – नवरा बायकोत चांगले संबंध राहतील. विवाहबाह्य संबंधांपासून दूर राहा. खबरदारी – स्नायूंचा ताण आणि वेदनांची समस्या वाढू शकते. व्यायाम आणि योगासनांकडेही अधिक लक्ष द्या. शुभ रंग – लाल भाग्यवान अक्षर – र अनुकूल क्रमांक – 2

मीन –

आज कुटुंबातील वातावरण व्यवस्थित ठेवण्यासाठी काही महत्त्वाचे नियम केले जातील आणि त्यात यशही मिळेल. घरातील कोणत्याही सदस्याच्या विवाहाबाबत मांगलिक कार्याशी संबंधित योजना बनवल्या जातील. ऑनलाइन शॉपिंगही होईल. बाहेरच्या व्यक्तीशी किंवा शेजाऱ्याशी वाद किंवा भांडण झाल्यासारखी परिस्थिती आहे. त्यामुळे अनावश्यक गोष्टींकडे लक्ष देऊ नका आणि तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. बोलताना शब्दांची विशेष काळजी घ्या. कौटुंबिक व्यस्ततेमुळे तुम्ही व्यवसायात जास्त लक्ष देऊ शकणार नाही. मात्र तरीही उपक्रम सुरळीत सुरू राहतील. मालमत्तेशी संबंधित कोणताही निर्णय घेऊ नका आणि ही कामे स्थगित ठेवा.

लव फोकस – तुमच्या कोणत्याही अडचणीत जीवनसाथी किंवा कुटुंबातील सदस्यांचा सल्ला अवश्य घ्या. प्रेमाचे नाते चांगले ठेवण्यासाठी एकमेकांच्या भावनांची काळजी घेणे आवश्यक. खबरदारी – सध्याच्या वातावरणापासून स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी तुमची दिनचर्या आणि खाण्याच्या सवयी अतिशय व्यवस्थित ठेवा. शुभ रंग – ऑरेज भाग्यवान अक्षर – स अनुकूल क्रमांक – 5

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?