AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Surya Grahan 2024 : सर्वपित्री दर्श अमावस्येला असणार वर्षाचे दूसरे सूर्यग्रहण, अवकाशात अद्भूत नजारा

सूर्यग्रहण 2024: वर्षातील दुसरे सूर्यग्रहण अनेकदृष्टीने खास असणार आहे. या दिवशी आकाशात एक दुर्मिळ नजारा पाहायला मिळणार आहे. चला तर पाहूयात वर्षातील दुसरे सूर्यग्रहण कधी होणार आणि ते भारतात दिसेल की नाही ? पाहूयात...

Surya Grahan 2024 : सर्वपित्री दर्श अमावस्येला असणार वर्षाचे दूसरे सूर्यग्रहण, अवकाशात अद्भूत नजारा
annular solar eclipse Image Credit source: TV9MARATHI
| Updated on: Jul 29, 2024 | 9:31 PM
Share

साल 2024 चे पहिले सुर्यग्रहण 8 एप्रिल रोजी लागले होते. आता या वर्षीचे दुसरे सुर्यग्रहण येत्या ऑक्टोबर महिन्यात लागणार आहे. चंद्रग्रहण तसेच सुर्यग्रहणाला धार्मिक महत्व असले तरी या खगोलीय घटनेकडे अवकाशप्रेमी आणि खगोल अभ्यासक एक खगोलीय घटना म्हणून पाहातात. त्यामुळे खगोल वैज्ञानिकता मोठा उत्साह पसरला आहे. हिंदू धर्मशास्रानूसार ग्रहणाच्या काळाला महत्वाचे काळ मानले गेले आहे. हिंदू धर्मात ग्रहणकाळाला अशूभ मानले जाते. तर फलज्योतीष शास्रानूसार ग्रहणाचा प्रभाव देश आणि जगासह सर्व राशींवर होत असतो. चंद्र जेव्हा सुर्याला अंशत:  किंवा संपूर्णपणे झाकतो तेव्हा सुर्य प्रकाश पृथ्वीवर पोहचू शकत नाही किंवा कमी पोहचतो.  खंग्रास सुर्यग्रहणाच्या वेळी संपूर्ण अंधार पसरतो आणि पक्षी देखील आपल्या घरट्यांकडे परतू लागतात. कधी दिवसा आकाशात तारे दिसू लागतात. तर कधी कधी थंडी देखील वाजू लागते. यास सूर्यग्रहण असे म्हटले जात आहे.

वर्षाचे दुसरे सुर्यग्रहण केव्हा ?

वर्षाचे दुसरे सुर्यग्रहण बुधवार दिनांक 2 ऑक्टोबर रोजी होणार आहे. पंचांगाप्रमाणे या दिवशी भाद्रपद अमावस्या म्हणजेच सर्वपित्री दर्श अमावस्या असणार आहे. याच दिवशी पितृ पक्ष म्हणजे पित्रांना नैवेद्य दाखविण्याचा शेवटचा दिवस असेल. 2ऑक्टोबर रोजी सूर्यग्रहण रात्री 09:13 सुरु होईल आणि 03:17 वाजेपर्यंत असणार आहे. ग्रहणाचा एकूण कालावधी 6 तासांचा असणार आहे.

भारतातून दिसणार सूर्य ग्रहण? (Surya Grahan 2024 in India)

हे सुर्यग्रहण कंकणाकृती असणार आहे. भारतीय वेळेप्रमाणे ते रात्री सुरु होणार आहे. त्यामुळे भारतातून ते दिसणार नाही. भारतातून सूर्यग्रहण दिसणार नसल्याने ग्रहणाचा सुतक काळ देखील पाळण्याची गरज नाही. आणि पूजाविधी सारखे धार्मिक विधी देखील कोणतेही बंधन नसणार आहे.

खूपच दुर्लभ असेल वर्षांचे हे दूसरे सूर्य ग्रहण

2 ऑक्टोबर रोजी लागणारे सुर्यग्रहण अद्वितीय असणार आहे. या दरम्यान सुर्याचे कंकणाकृती रुप दिसणार आहे. हे सूर्यग्रहण कंकणाकृती असल्याने सुर्याभोवती रिंग असणार आहे. ज्यावेळी सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत येतात तेव्हा अवकाशात चंद्र सुर्याला झाकतो. परंतू जेव्हा चंद्र आपल्या कक्षेत सर्वात दूरच्या स्थानी असतो तेव्हा तो छोटा दिसत असतो. अशा वेळी सुर्याला संपूर्ण झाकण्याऐवजी सुर्याच्या मधल्या भागाला चंद्र झाकतो. त्यामुळे चंद्राभोवती कंकणाकृती तयार होते. त्यालाचा कंकणा कृती दिसते.या वेळी अवकाशात सुर्याचा प्रकाश एका रिंग सारखा दिसतो. यास शास्रज्ञ (Ring of Fire) ‘रिंग ऑफ फायर’ चा नजारा म्हणतात.

Follow Us
वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद - बजरंग सोनवणे
Bajrang Sonawane : वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद; बजरंग सोनवणेंचा गंभीर आरोप
1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
Amravati : अमरावतीत दुष्काळाचा कहर; 1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना...
Chandrshekhar Bawankule : 50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड अन्...
उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी
NCP Sharad Pawar on CJP : उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी जाहीर केला पाठिंबा
पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
Sanjay Raut on Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा दावा! पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
CM DCM Meeting : रात्री उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन; जागावाटपावर खलबतं - सुत्र
लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं एवढ्या कोटींना विकलं
Lalbaugcha Raja Auction : लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं तब्बल एवढ्या कोटींना विकलं! बाप्पाचा आशीर्वाद मानून भक्तानेच खरेदी केलं
मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? तब्बल एवढ्या कोटींच्या....
Manoj Jarange ED : मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? आर्थिक व्यवहारांची गोपनीय चौकशी सुरू; तब्बल एवढ्या कोटींच्या व्यवहारांचा दावा
हे जैनांचं नाही, आगरी-कोळी, मराठी बांधवांचं शहर; मनसेचा कोणाला टोला?
MNS On Narendra Mehata : मीरा-भाईंदरच्या ओळखीवरून राजकीय रणकंदन! हे जैनांचं नाही, आगरी-कोळी आणि मराठी बांधवांचं शहर; मनसेचा नेमका कोणाला टोला?
मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने...
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने खळबळ; संजय राऊतांनी थेट...