मृत्यूचं द्वार, असा एक दरवाजा जिथे एक रात्र मुक्काम करताच होतो मृत्यू, काय आहे नेमकं रहस्य?

भारतामध्ये असे अनेक मंदिरं आणि ठिकाणं आहेत, जी आजही न उलगडलेल्या रहस्यांनी भरलेली आहेत. या ठिकाणाचं नेमकं रहस्य काय आहे?  याचं उत्तर आज देखील कोणीही देऊ शकत नाही.

मृत्यूचं द्वार, असा एक दरवाजा जिथे एक रात्र मुक्काम करताच होतो मृत्यू, काय आहे नेमकं रहस्य?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 15, 2025 | 9:28 PM

भारतामध्ये असे अनेक मंदिरं आणि ठिकाणं आहेत, जी आजही न उलगडलेल्या रहस्यांनी भरलेली आहेत. या ठिकाणाचं नेमकं रहस्य काय आहे?  याचं उत्तर आज देखील कोणीही देऊ शकत नाही. यातीलच एक ठिकाण म्हणजे कैलास मानसरोवर, कैलास मानसरोवराचा संपूर्ण परिसर अशा अनेक धार्मिक रहस्यांनी भरलेला आहे. तुम्ही कधी जर कैलास यात्रेसाठी गेलात तर तुम्हाला तिथे अशी अनेक ठिकाणं सापडतील, त्यामागचं रहस्य आजून कोणालाही उलगडता आलेलं नाहीये.

कैलास मानसरोवराच्या परिसरात असलेल्या अष्टपद, सप्तऋषी गुफा आणि यम द्वार या ठिकाणांना धार्मिक दृष्टीकोणातून विशेष महत्त्व आहे. या सर्व ठिकाणांची वेगवेगळी अख्यायिका आहे. मात्र या सर्वांमध्ये यम द्वार हे ठिकाण खूपच रहस्यमयी आहे. या ठिकाणाबाबत असा दावा केला जातो की, जर या दरवाजामध्ये एखाद्या व्यक्तीने रात्रभर मुक्काम केला तर त्याचा मृत्यू होतो.

हिंदू धर्मशास्त्रानुसार यम द्वाराला मृत्यूची देवता यमाचं प्रवेश द्वार मानण्यात आलं आहे. हे यमद्वार कैलास पर्वत परिक्रमेच्या वाटेवर आहे. हे दारचेनपासून जवळपास 30 मिनिटांच्या अंतरावर आहे. या यम द्वाराला तिबेटी भाषेत तारबोचे असं देखील म्हटलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार जर तुम्ही या यम द्वारामध्ये एक रात्र राहिलात तर तुमचा मृत्यू होतो. तसेच तुम्ही जर या ठिकाणाला भेट द्यायला गेलात तर मागं वळून देखील बघू नका, कारण तसं करणं अशुभ मानलं गेलं आहे.

स्थानिक लोकांकडून असा दावा केला जातो की, तुम्ही जर या यम द्वारावर रात्री मुक्काम केला तर तुमचा मृत्यू होतो. अशा काही घटना देखील घडल्याचा दावा येथील स्थानिक लोक करतात. येथील लोक इथे मुक्काम न करण्याचा सल्ला देखील देतात. मात्र या मागचं नेमकं रहस्य काय आहे? स्थानिक लोकांच्या दाव्यात किती सत्यता आहे? हे अजूनही समोर आलेलं नाहीये.

डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)