नागमणी खरंच असतो का? काय आहेत भाकडकथा? सापांच्या विश्वाबाबत असं आहे गूढ रहस्य

सापाच्या विश्वाबाबत कायम कुतुहूल राहीलं आहे. अनेकदा गैरसमजातून सापांना मारलं जातं. काही अंधश्रद्धाही सापांबाबत पाळल्या जातात. त्यापैकी एक म्हणजे नागमणी.. चित्रपट, पिढ्यानुपिढ्या कथा, पौराणिक कथा यात याबाबत सांगितलं गेलं आहे. त्यामुळे याबाबत कायम आकर्षण राहीलं आहे. पण खरंच असं आहे का?

नागमणी खरंच असतो का? काय आहेत भाकडकथा? सापांच्या विश्वाबाबत असं आहे गूढ रहस्य
नागमणी खरंच असतो का? काय आहेत भाकडकथा? सापांच्या विश्वाबाबत असं आहे गूढ रहस्य
Image Credit source: TV9 Network File Photo
| Updated on: Jul 19, 2025 | 6:45 PM

हिंदू धर्मात सापांच्या जगाकडे कायम आश्चर्याने पाहीलं जातं. अनेक स्त्रोतांच्या माध्यमातून सापांचा उदोउदो केला जातो. कालसर्प योग विधी वगैरे केले जातात. शिवलिंगावरही साप असल्याने साप आणि हिंदू धर्माचं एक वेगळं नातं आहे. अंधश्रद्धेच्या विश्वातही सापाचं महत्त्व आहे. यात काही भाकडकथा वाचल्यानंतर, ऐकल्यानंतर आणि पाहील्यानंतर कुतुहूल वाढलं आहे. चित्रपटातूनही सापांचं विश्वाबाबत काल्पनिक तथ्य मांडण्यात आली आहेत. त्यामुळे कुतुहूल असणार यात काही शंकाच नाही. सापांच्या विश्वाची चर्चा होताना नागमणीची चर्चा होत असते. पण खरंच ही अद्भूत अशी वस्तू अस्तित्वात का? या नागमणीबाबत अनेक लोककथा प्रचलित आहेत. सापाच्या डोक्यावर हा मणी असतो असं त्यातून सांगितलं जातं. नागमणि हा शब्द संस्कृत शब्द “नाग” म्हणजे साप आणि “मणि” म्हणजे रत्न यापासून आला आहे. हिंदू श्रद्धेनुसार, हे रहस्यमय रत्न विषारी सापांच्या विशेषतः नागांच्या डोक्यात आढळते असे म्हटले जाते. या नागमणीमुळे सर्व इच्छा पूर्ण होतात वगैरे असा गैरसमज आहे. त्यामुळे त्याबाबत आश्चर्य वाटणार यात काही शंका नाही. पौराणिक कथा, अध्यात्म आणि विज्ञानात याबाबत वेगळी मतं आहेत.

नागिणसारख्या चित्रपट आणि टीव्ही मालिकांमुळे याबाबत गूढ वाढतं. पण त्यात काही तथ्य नसून ते पूर्णपणे काल्पनिक आहे. नागमणी अंधारात चमकतो, विष उतरवतो, मूड किंवा धोक्यानुसार रंग बदलतो, शारीरिक किंवा आध्यात्मिक आजार बरे करतो, संपत्ती किंवा सौभाग्य आकर्षित करतो अशा भाकडकथा या चित्रपट आणि मालिकांमध्ये रंगवून सांगितल्या जातात. नागमणी बाळगल्याने अमरत्व मिळते किंवा एखाद्याला दैवी शक्तींशी संवाद साधता येतो, अशी अंधश्रद्धा आहे. हे फक्त चित्रपटात दाखवल्याने अनेकांना विश्वासही बसतो. पण त्यात काही तथ्य नाही.

“जिओलॉजी इनसाइड” नुसार, आधुनिक विज्ञान या दाव्याचे पूर्णपणे खंडन करते. सापांमध्ये मोती तयार करण्याची शारीरिक क्षमता नसते. सापाच्या डोक्यात मोती असण्याचे समर्थन करणारी कोणतीही जैविक प्रक्रिया नाही. शिंपल्यासारखे सापांचे शरीर मोती तयार करणारे नसते. वैज्ञानिक मानकांनुसार रत्ने किंवा मोती तयार करण्यास पात्र नाहीत. अशा स्थितीत या फक्त भाकडकथा आहेत.