सूर्यदेवाच्या भ्रमणात बदल होणार असून ‘या’ 4 राशींसाठी उघडतील भाग्याचे दरवाजे
ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य मृगशिरा नक्षत्रातून राहूच्या आर्द्रा नक्षत्रात प्रवेश करेल. हे परिवर्तन पावसाचे सुरुवातीचे प्रतीक आहे. या विशेष परिवर्तनाचा परिणाम सर्व राशींवर होणार असला तरी या चार राशींसाठी हे अत्यंत शुभ आणि वरदान ठरेल. चला तर मग आजच्या लेखात आपण कोणत्या आहेत या 4 राशी त्याबद्दल जाणून घेऊयात.

ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यदेवाला ग्रहांचा राजा मानले जाते. त्याला आत्मा, पिता, आत्मविश्वास आणि इतर अनेक गोष्टींचे प्रतीक मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याचे राशी आणि नक्षत्रांमधील बदल खूप विशेष आणि महत्त्वाचे मानले जातात. 15 जून रोजी सूर्याने वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश केला. आता सूर्याचे भ्रमण लवकरच पुन्हा बदलणार आहे. यावेळी सूर्य नक्षत्र बदलणार आहे.
द्रिक पंचांगानुसार सोमवार 22 जून 2026 रोजी दुपारी 12 वाजून 31 मिनिटांनी सूर्य मृगशिरा नक्षत्रातून बाहेर पडून आर्द्रा नक्षत्रात प्रवेश करेल. हे नक्षत्र रहस्यमय ग्रह राहूचे नक्षत्र मानले जाते. सूर्याचा आर्द्रा नक्षत्रातील प्रवेश संक्रांतीच्या सणासारखाच विशेष मानला जातो, कारण या दिवशी पावसाळ्याची अधिकृत सुरुवात होते. सूर्याच्या या हालचालीतील बदलाचा परिणाम सर्व 12 राशींवर होईल, मात्र मेष, मिथुन, सिंह आणि धनु राशींसाठी सूर्याचा हा नक्षत्रबदल वरदान ठरू शकतो. चला तर मग आजच्या लेखात आपण याबदलाचा या चार राशींवर कसा होतो ते जाणून घेऊयात.
मेष रास
सूर्याचे मेष राशीतील संक्रमण अत्यंत शुभ ठरू शकते. या काळात तुमचे धैर्य वाढू शकते. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून पाठिंबा मिळू शकतो. प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. गुंतवणुकीसाठी हा शुभ काळ आहे.
मिथुन रास
सूर्याच्या नक्षत्रातील बदलाचा मिथुन राशीच्या व्यक्तिमत्त्वावर परिणाम होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी आदर आणि सन्मान वाढू शकतो. बऱ्याच काळापासून रखडलेल्या कामांना गती मिळू शकते. व्यावसायिक दौरे फायदेशीर ठरू शकतात.
सिंह रास
सूर्याच्या नक्षत्रातील हा बदल सिंह राशीच्या व्यक्तींसाठी विशेषतः फलदायी ठरू शकतो. या काळात तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढू शकतात. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. शासकीय कामात यश मिळण्याची शक्यता आहे.
धनु रास
सूर्याचे हे नक्षत्र स्थित्यंतर धनु राशीच्या लोकांसाठी भाग्याचे दरवाजे उघडू शकते. नवीन व्यावसायिक भागीदार मिळू शकतात, ज्यामुळे भविष्यात नफा होऊ शकतो. या काळात नशीब तुमच्या बाजूने असू शकते. तुम्हाला वडिलोपार्जित मालमत्तेचा लाभ मिळू शकतो.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)