Grahan 2026 : अवघ्या 15 दिवसांत 2 ग्रहणं… रहा सावध ! या गोष्टी करूच नका..

ज्योतिष आणि धार्मिक श्रद्धेनुसार, ग्रहण ही विशेष आणि संवेदनशील खगोलीय घटना मानली जाते. हिंदू धर्मात, सूर्य आणि चंद्रग्रहण दोन्ही अशुभ परिणाम देणारे मानले जातात. 2026 मध्ये, फाल्गुन महिन्यात एकाच महिन्यात दोन मोठे ग्रहण होणार आहेत, ज्यामुळे त्याचे धार्मिक आणि ज्योतिषीय महत्त्व आणखी वाढले आहे.

Grahan 2026 : अवघ्या 15 दिवसांत 2 ग्रहणं... रहा सावध ! या गोष्टी करूच नका..
ग्रहण 2026
Image Credit source: TV9 bharatvasrh
| Updated on: Feb 05, 2026 | 2:10 PM

Eclipses 2026 Dates : हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रात ग्रहण म्हणजे खूप महत्त्वाच्या घटना मानल्या जातात. 2026 ची सुरुवात खगोलीय आणि धार्मिकदृष्ट्या अत्यंत घटनापूर्ण असेल. फेब्रुवारी ते मार्च दरम्यान फक्त 15 दिवसांच्या अंतराने सूर्य आणि चंद्रग्रहण होणार आहे. शास्त्रांनुसार, जेव्हा एकाच महिन्यात (फाल्गुन) दोन ग्रहणे होतात तेव्हा ते शुभ मानले जात नाही. या दोन्ही ग्रहणांसाठी सुतक काळाची नेमकी तारीख, वेळ आणि नियम काय आहेत, ते जाणून घेऊया.

सूर्य ग्रहण 2026 (17 फेब्रुवारी )

या वर्षातील पहिले सूर्यग्रहण 17 फेब्रुवारी 2026 रोजी फाल्गुन महिन्यातील अमावस्येच्या दिवशी होईल.

हे ग्रहण भारतात दिसेल का? तर याचं उत्तर नाही असं आहे. भारतात हे सूर्यग्रहण दिसणार नाहीये.

सुतक काळ : धार्मिक मान्यतेनुसार, भारतात न दिसणाऱ्या ग्रहणासाठीचा सुतक काळ इथे वैध नाही. त्यामुळे या दिवशी सामान्य जीवनावर किंवा धार्मिक कार्यांवर कोणतेही निर्बंध राहणार नाहीत.

चंद्र ग्रहण 2026 (3 मार्च)

मात्र सूर्यग्रहणानंतर बरोब्बर 15 दिवसांनी 3 मार्च 2026 रोजी चंद्रग्रहण होईल. विशेष म्हणजे, या दिवशी होलिका दहनाचा सण देखील येत आहे.

हे भारतात दिसेल का ? तर त्याचं उत्तर हो असं आहे. हे चंद्रग्रहण भारतात पूर्णपणे दिसणार आहे.

सुतक काळ : हे ग्रहण भारतात दिसणार असल्याने, सुतक काळ लागू असेल. चंद्रग्रहणासाठी सुतक काळ ग्रहण सुरू होण्याच्या नऊ तास आधी सुरू होतो.

सुतक काळात काय करावे आणि काय करू नये?

भारतात जेव्हा ग्रहण दिसते तेव्हा सुतक काळातील नियमांचे पालन करणे अनिवार्य मानले जाते:

मंदिराचे दरवाजे बंद: सुतक काळ सुरू होताच मंदिराचे दरवाजे बंद केले जातात. घरी पूजा आणि प्रार्थना करण्यासही मनाई असते.

खाण्याचे नियम : या काळात स्वयंपाक करणे आणि खाणे टाळावे. मात्र, हा नियम आजारी, वृद्ध आणि मुलांना लागू होत नाही.

तुळशीची पाने : सुतक काळ सुरू होण्यापूर्वी, तुळशीची पाने दूध, दही आणि शिजवलेल्या अन्नात घालावीत जेणेकरून त्यांच्यावर ग्रहणाचा परिणाम होणार नाही.

मंत्रांचा जप : ग्रहणाच्या वेळी शांत बसून देवाचे ध्यान करणे किंवा मंत्रांचा जप करणे खूप फलदायी मानले जाते.

का मानलं जातं अशुभ ?

धार्मिक दृष्टिकोनातून, ग्रहणाच्या वेळी राहू आणि केतूची सावली सूर्य किंवा चंद्रावर पडते, ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा कमी होते. एकाच महिन्यात दोन ग्रहणे देखील नैसर्गिक आपत्ती किंवा सार्वजनिक जीवनात व्यत्यय आणण्याचे लक्षण मानले जातात.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)