तुम्हीही नखे कापल्यानंतर घरात कुठेही फेकता किंवा कचऱ्याच्या डब्यात टाकता का? ही सवय अडचणीत आणू शकते, हे वाचाच
आपण नखे कापल्यानंतर त्यांची योग्य विल्हेवाट का लावायला हवी असं नेहमी म्हटलं जातं. तंत्रशास्त्रानुसार, नखांचा वापर नकारात्मक कार्यांसाठी होऊ शकतो. त्यामुळे नखे कचऱ्यात किंवा इतरत्र फेकण्याची सवय अडचणीत आणू शकते. नखे कापल्यानंतर त्यांची विल्हेवाट नक्की कशा लावावी, ते कुठे टाकावीत याबद्दल जाणून घेऊयात.

आपण अनेकदा नखे कापण्याबद्दल अनेक गोष्टी ऐकल्या असतील. जसे की कोणत्या दिवशी नखे कापावी? किंवा नखे कापल्यानंतर कुठे ती टाकावी? घरातील वडीलधाऱ्यांनी देखील हे अनेकदा सांगितलेलं आपण ऐकलं असेल. पण नखांबाबत एवढी काळजी का घेतली जाते? कारण त्यामागे एक कारण आहे ते म्हणजे ब्लॅक मॅजिक. होय, तंत्र शास्त्र किंवा विधींमध्ये नखांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो असं म्हटलं जातं. म्हणून घरातील वडीलधारी मंडळीही नखे इकडे तिकडे फेकण्याचा सल्ला देत नाहीत. जर तुम्ही नखे कापून इकडे तिकडे फेकले तर ही सवय तुम्हाला अडचणीत आणू शकते. एवढंच नाही तर नखे कापल्यानंतर आपल्याच नखांचा आपल्या आयुष्यात सकारात्मकता आणण्यासाठी कशापद्धतीने वापर केला जातो, त्याचे उपाय कोणते हे देखील जाणून घेऊयात.
नखे कापून याठिकाणी टाकू नयेत
नखे कधीही कापून इकडे तिकडे फेकून देऊ नयेत. तसेच, नखे कचऱ्याच्या डब्यात टाकू नयेत याची काळजी घ्यावी. नखे कापल्यानंतर, ते एकत्र गोळा करा, कागदात गुंडाळा आणि मातीत पुरून टाका.
असे नखे कापू नयेत
सूर्यास्ताच्या वेळी कधीही नखे कापू नयेत. असे करणे पाप मानले जाते. सूर्यास्त हा ब्रह्म मुहूर्ताचा काळ मानला जातो, जो पूजेचा काळ असतो, म्हणून या काळात नखे कापू नयेत. असे केल्याने एखाद्या व्यक्तीची ऑरा खराब होऊ शकतो. ज्यामुळे त्यांच्या जीवनात अनेक अडचणी येऊ शकतात.
नखांबाबत करायचे उपाय
नखे कधीही इकडे तिकडे फेकू नयेत. नखे शुक्रवारी कापणे चांगले मानले जाते. नखे कापून वडाच्या झाडाच्या मुळाशी पुरून टाकल्याने आयुष्यातील नकारात्मकता निघून जाण्यास मदत होते. जर तुमच्या घराजवळ वडाचे झाड नसेल तर तुम्ही ते पिंपळसोडून कोणत्याही झाडाच्या मुळाशी पुरू शकता.
आंघोळीनंतर नखे कापू नयेत
आंघोळीनंतर नखे न कापता ते आंघोळीपूर्वीच नखे कापली पाहिजेत. आंघोळीनंतर लगेच नखे कधीही कापू नयेत. असे करणे शुभ मानले जात नाही. त्यामुळे नोकरी आणि व्यवसायात अनेक अडचणी येऊ शकतात.
या दिवशी नखे कापू नका
सोमवार, मंगळवार, गुरुवार किंवा ग्रहणांच्या वेळी कधीही नखे कापू नयेत. असे मानले जाते की या दिवशी नखे कापल्याने कर्ज वाढते आणि हळूहळू आर्थिकस्थिती बिघडते. वैवाहिक संबंधांमध्येही चढ-उतार येतात. नेहमी बुधवार आणि शुक्रवारी नखे कापणे शुभ मानले जाते. या दिवशी नखे कापल्याने सर्व नकारात्मक प्रभाव दूर होतात आणि आनंद आणि समृद्धीच्या शुभ संधी निर्माण होतात.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
