Daily Panchang 5 May 2022: आजचे पंचांग 05 मे 2022 : आज श्रीरामानुजाचार्य जयंती, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि राहू काळ

आज श्रीरामानुजाचार्य जयंती आहे. ज्योतिषशास्त्रात पंचांगाचे खूप महत्व आहे.

Daily Panchang 5 May 2022: आजचे पंचांग 05 मे 2022 : आज श्रीरामानुजाचार्य जयंती, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि राहू काळ
ज्योतिषशास्रात पंचांगाचे खूप महत्व आहे
Image Credit source: TV9 Marathi
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सिद्धेश सावंत

May 05, 2022 | 11:02 AM

मुंबई : आजचे पंचांग ( Aaj Che Panchang) 5 मे, 2022 गुरूवार. आज श्रीरामानुजाचार्य जयंती आहे. ज्योतिषशास्त्रात पंचांगाचे (Panchang)  खूप महत्व आहे. पंचाग हे ज्योतिषशास्त्राच्या पाच भागांचे मिश्रण आहे. ज्यामध्ये तिथी, वार, करण, योग, आणि नक्षत्र यांचा समावेश होतो. या सर्वांच्या मदतीने आपल्याला दिवसातील शुभ आणि अशुभ काळ शोधू शकतो. पंचाग मुख्यत्वे चंद्र आणि सूर्याची हालचाल दर्शवते. एका महिन्यात तीस तिथी असतात. या तिथी दोन भागात विभागल्या असतात.

  1. सूर्योदय:  सकाळी 6-10,
  2. सूर्यास्त: सायं. 7-01,
  3. चंद्रोदय: सकाळी 9-14,
  4. चंद्रास्त: रात्री 11-02,
  5. पूर्ण भरती: दुपारी 3-00 पाण्याची उंची 4.05 मीटर, उत्तररात्री 2-24 पाण्याची उंची 3.41 मीटर,
  6. पूर्ण ओहोटी: सकाळी 7-41 पाण्याची उंची 0.89 मीटर, रात्री 8.47 पाण्याची उंची 2.09 मीटर.
  7. दिनविशेष: श्रीरामानुजाचार्य जयंती.

शुभ मुहूर्त 05 मे 2022 : (Shubh Muhurta)

विजय मुहूर्त दुपारी 02 वाजून 32 मिनिट ते 03 वाजून 25 मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी 10 वाजून 04 मिनिट ते 11 वाजून 52 मिनिटांपर्यत. रवि योग सकाळी 05 वाजून 37 मिनिट ते 06 वाजून 17 मिनिटांपर्यत

सुकर्मा योग संध्याकाळी 06 वाजून 06 मिनिटांपर्यंत त्यानंतर धृतिमान योगाची सुरुवात. विष्टी करण पुर्वान्ह 10 वाजून 01 मिनिटांपर्यंत. त्यानंतर बालव करणाची सुरुवात. चंद्रमा दिवस-रात्र मिथुन राशीत संचार करेल.

राहू काळ 05 मे 2022 : (Rahu kaal)

राहूकाळ अपरात्री 01 वाजून 30 मिनिट ते 03 वाजेपर्यंत. चतुर्थी तिथि पुर्वान्ह 10 वाजून 01 मिनिटांपर्यंत. त्यानंतर पंचमी तिथीची सुरुवात. मृगशिरा नक्षत्र संध्याकाळी 06 वाजून 16 मिनिटांपर्यंत. त्यानंतर आर्द्रा नक्षत्राची सुरुवात.

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें