एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात दोन ग्रह राशी बदलणार, ‘या’ राशींना होणार मोठा फायदा…

Nupur Chilkulwar

Nupur Chilkulwar |

Updated on: Apr 01, 2021 | 9:27 AM

मुंबई : आज एप्रिल महिन्याची पहिली तारीख (01 April 2021) आहे. एप्रिलच्या सुरुवातीलाच ग्रहांची चाल बदलणार (Transit Of Mercury And Jupiter) आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात दोन महत्वपूर्ण ग्रह हे राशी परिवर्तन करणार आहेत. ज्याचा थेट परिणाम अनेकांच्या आयुष्यावर होणार आहे (Transit Of Mercury And Jupiter Planets In The First Week Of April These Zodiac Signs […]

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात दोन ग्रह राशी बदलणार, 'या' राशींना होणार मोठा फायदा...
Planet

मुंबई : आज एप्रिल महिन्याची पहिली तारीख (01 April 2021) आहे. एप्रिलच्या सुरुवातीलाच ग्रहांची चाल बदलणार (Transit Of Mercury And Jupiter) आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात दोन महत्वपूर्ण ग्रह हे राशी परिवर्तन करणार आहेत. ज्याचा थेट परिणाम अनेकांच्या आयुष्यावर होणार आहे (Transit Of Mercury And Jupiter Planets In The First Week Of April These Zodiac Signs Will Get Big Benefit).

एप्रिल महिन्याच्या पहिल्या दिवशी बुध ग्रह राशी परिवर्तन करणार आहे. तो सध्या कुंभ राशीत आहे आणि आज 1 एप्रिलला तो मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. बुध हा मीन राशीमध्ये 16 एप्रिलपर्यंत असेल. त्यानंतर तो मेष राशीत प्रवेश करेल. तर 6 एप्रिलला देव गुरु बृहस्पती आपलं राशी परिवर्तन करेल. तो सध्या मकर राशीत आहे आणि 6 एप्रिलला मकरमधून कुंभ राशी प्रवेश करेल आणि 14 सप्टेंबरपर्यंत कुंभ राशीतच राहील.

चला जाणून घेऊ बुध आणि बृहस्पतीचं राशी परिवर्तन कुठल्या राशींसाठी शुभ असेल –

बुधच्या राशी परिवर्तनाने या राशींना होणार लाभ

वृषभ राशी : बुधच्या राशी परिवर्तनाने वृषभ राशीच्या लेकांना लाभ होईल. कार्यक्षेत्रात तुम्ही एकावेळी अनेक महत्त्वाची कामं सांभाळाल, ज्यामुळे तुमचं पद आणि मान-सन्मान वाढेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील. वृषभ राशीच्या व्यापाऱ्यांसाठी व्यवसाय वाढवण्यासाठी हा उत्तम काळ आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही फायदा होईल. कौटुंबिक संबंध मजबूत होतील.

मिथुन राशी : या राशीच्या लोकांसाठीही बुधचं राशी परिवर्तन शुभ असेल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. कुठे फिरायला जाण्याची योजना बनवू शकता. आरोग्याबाबत दुर्लक्ष करु नका अन्यथा समस्या उद्भवू शकते. तुमचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो, त्यामुळे कुठलाही निर्णय घेण्यात अडचण येईल. पण तुम्हाला कुठलाही निर्णय घेताना आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवावा लागेल.

कन्या राशी : कन्या राशीच्या लोकांना बुधच्या राशी परिवर्तनाने मोठा फायदा होईल. तुमच्या कठीण परिश्रमाचं फळ मिळण्याची वेळ आता आली आहे. पदोन्नति आणि वेतनात वृद्धी होऊ शकते. व्यापाऱ्यांना नफा होऊ शकतो.

गुरु बृहस्पतीच्या राशी परिवर्तन या राशीच्या लोकांना लाभ होणार

मेष राशी : या राशीच्या लोकांना गुरु बृहस्पतीच्या राशी परिवर्तनाने मोठा लाभ होईल. ज्यांना मूल होण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी अपेक्षित आहे. घरात धार्मिक कार्यक्रम होतील. संपत्तीची नवीन साधने तयार होऊ शकतात. विद्यार्थ्यांसाठीही वेळ अनुकूल आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या लोकांना याचा लाभ मिळू शकेल (Transit Of Mercury And Jupiter Planets In The First Week Of April These Zodiac Signs Will Get Big Benefit).

वृषभ राशी : देव गुरु बृहस्पतीच्या राशी परिवर्तनाने वृषभ राशीच्या लोकांना देखील फायदा होईल. सर्व रखडलेली कामे करता येतील. धन लाभ होऊ शकतो. वडिलांच्या जमिनीबाबत वाद असल्यास तो सोडवला जाऊ शकतो. मान, सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. जर आपण नोकरी करत असाल तर पद वाढू शकते.

मिथुन राशी : मिथुन राशीच्या लोकांसाठी बृहस्पतिचं राशी परिवर्तन शुभ असेल. विवाह आणि मूल होण्याचा योग जुळतो आहे. नोकरीत बढती मिळू शकेल. थांबलेले सरकारी काम मार्गी लागतील. आपल्या योजना चांगले परिणाम देतील. धर्म-कर्माकडे कल वाढेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार होतील.

Transit Of Mercury And Jupiter Planets In The First Week Of April These Zodiac Signs Will Get Big Benefit

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Horoscope 01 April 2021 | गुरुवारच्या दिवशी बुधचं राशी परिवर्तन, जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल….

Vastu Tips | करिअरमध्ये यश हवं असेल, तर ‘या’ काही गोष्टी लक्षात ठेवा, फायदा होईल…

Shree Ganesha | गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी ‘हे’ पाच उपाय करा, सर्व इच्छा होतील पूर्ण…

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI