AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tulsi Benefits: तुळशीचे रोप लावताना या गोष्टींची घ्या काळजी, मिळतील असंख्य फायदे

ज्या घरांमध्ये तुळशीचे रोप असते आणि सकाळ-संध्याकाळ पूजा आणि सेवा केली जाते, त्या घरावर माता लक्ष्मीची कृपा कायम राहते. वास्तूमध्ये तुळशीच्या रोपाचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे.

Tulsi Benefits: तुळशीचे रोप लावताना या गोष्टींची घ्या काळजी, मिळतील असंख्य फायदे
तुळशीची पूजा Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Aug 20, 2022 | 9:21 AM
Share

Tulsi Benefits: हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्त्व (Tulsi Importance) आहे. तुळशीचे रोप (Tulsi Puja) अत्यंत पूजनीय मानले जाते. देवी-देवतांना तुळशीची पाने अर्पण करण्याची परंपरा आहे, परंतु भगवान शंकर आणि गणपतीच्या पूजेत तुळशीचा वापर केला जात नाही. तुळशीला हरिप्रिया म्हणतात. हे लक्ष्मीचे रूप मानले जाते. घरामध्ये तुळशीचे रोप लावल्याने आणि त्याची पूजा केल्याने जीवनात नवी ऊर्जा येते. शास्त्रानुसार घरात तुळशीचे रोप लावून पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. असे मानले जाते की, ज्या घरांमध्ये तुळशीचे रोप असते आणि सकाळ-संध्याकाळ पूजा आणि सेवा केली जाते, त्या घरावर माता लक्ष्मीची कृपा कायम राहते. वास्तूमध्ये तुळशीच्या रोपाचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. सकारात्मक उर्जेसाठी तुळशीची वनस्पती खूप उपयुक्त आहे. तुळशीच्या रोपाचे महत्त्व आणि पूजेचे नियम इत्यादी जाणून घेऊया.

कार्तिक महिन्यात लावावी तुळस

जर तुमच्या घरी तुळस नसेल आणि तुम्हाला तुळस लावायची असेल तर ती कार्तिक महिन्यात लावावी. कार्तिक महिन्यात तुळशीचे रोप लावणे शुभ मानले जाते. कार्तिक हा महिना उत्तम मानला जातो. असे म्हटले जाते की, कार्तिक महिन्यात तुळशीचे रोप घरी आणले तर लक्ष्मीचे आगमन होते. कार्तिक महिन्यात गुरुवारी तुळस लावावी. गुरुवार हा भगवान विष्णूचा दिवस असून श्री विष्णूला तुळस फार प्रिय असते.

उत्तर-पूर्व दिशेला लावावी तुळस

वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप नेहमी घराच्या उत्तर किंवा उत्तर-पूर्व दिशेला लावावी. या दिशेला देवतांचा वास असल्याचे म्हटले जाते. घराच्या दक्षिण दिशेला तुळस कधीही लावू नये. जर तुम्ही दक्षिण दिशेला तुळस लावली तर तुम्हाला आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागते. ईशान्येला तुळशीचे रोप देखील ठेवू शकता. येथे तुळशीची रोप लावल्याने सकारात्मक परिणाम दिसून येतील.

चप्पल काढण्याच्या ठिकाणी तुळस नसावी

घराच्या प्रवेशद्वारावर किंवा अंगणात तुळस ठेवावी. मात्र, रद्दी, शूज किंवा चप्पल काढलेल्या ठिकाणी तुळशीचे रोप कधीही ठेवू नये. तुळशीचे रोप नेहमी मातीच्या कुंडीत लावावे. प्लास्टिकची कुंडी कधीही वापरू नका. कुंडी ही गेरूने रंगवा आणि शक्य असल्यास त्यावर चुन्याने किंवा हळदीने ‘श्री कृष्ण’ लिहावे.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी