AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaishakh Purnima 2023 : वैशाख पौर्णिमेला केलेल्या या उपायांनी होते आर्थिक चणचण दूर

नप्राप्तीसाठी आणि श्रीमंत होण्यासाठी आजची पौर्णिमा रात्र खूप खास आहे. आज रात्री लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी केलेले उपाय जलद फळ देतील.

Vaishakh Purnima 2023 : वैशाख पौर्णिमेला केलेल्या या उपायांनी होते आर्थिक चणचण दूर
माता लक्ष्मीImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: May 05, 2023 | 10:13 AM
Share

मुंबई : आज 5 मे, शुक्रवारी वैशाख पौर्णिमा (Vaishakh Purnima 2023) आहे. यासोबतच आज चंद्रग्रहणही (Chandra Grahan 2023) होत आहे. पौर्णिमेचा दिवस आणि शुक्रवार संपत्तीची देवी लक्ष्मीला समर्पित आहे. या संदर्भात, धनप्राप्तीसाठी आणि श्रीमंत होण्यासाठी आजची पौर्णिमा रात्र खूप खास आहे. आज रात्री लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी केलेले उपाय जलद फळ देतील. घरात सुख-समृद्धी वाढेल. वैशाख पौर्णिमेला देवी लक्ष्मीची पूजा करून धनसंपत्ती मिळवण्याचे मार्ग जाणून घेऊया.

पौर्णिमेचे उपाय

जर तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल, आर्थिक संकटातून सुटका हवी असेल तर वैशाख पौर्णिमेच्या रात्री करा हे सोपे उपाय. यामुळे तुमच्या घरात पैशाचा ओघ वाढेल.

  1.  आज वैशाख पौर्णिमेच्या दिवशी शुभ मुहूर्तावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा विधीपूर्वक करा. माता लक्ष्मीला पूजेत 11 पिवळ्या कवड्या अर्पण करा. पिवळ्या कवड्या नसल्यास पांढऱ्या भागात हळद टाकून त्याचा वापर करता येईल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी या कवड्या लाल कपड्यात बांधून आपल्या तिजोरीत ठेवा. यासोबतच माता लक्ष्मीची रोज प्रार्थना करा, तुमच्या जीवनात संपत्ती आणि आनंद वाढू लागेल.
  2. पौर्णिमेच्या दिवशी पांढरा रंग वापरणे शुभ मानले जाते. आज पांढरे कपडे घाला. माता लक्ष्मीची पूजा नियमानुसार करा. पूजेत देवी लक्ष्मीला लोणी आणि केशर मिश्रित खीर अर्पण करा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी स्नान करून या खिरीचा प्रसाद घ्यावा. माता लक्ष्मी प्रसन्न होऊन संपूर्ण कुटुंबाला आशीर्वाद देईल.
  3. तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीच्या मूर्ती किंवा चित्राजवळ गोमती चक्र स्थापित करा. कनकधारा स्तोत्राचे पठण करावे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे गोमती चक्र संपत्तीच्या ठिकाणी ठेवावे. यामुळे तुम्हाला व्यवसायात झपाट्याने प्रगती होईल. तुमच्या व्यवसायात खूप भरभराट होईल.
  4. वैशाख पौर्णिमेला सकाळी स्नान केल्यानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात थोडी हळद टाकून हे पाणी मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला शिंपडावे. तसेच मंदिरात नवीन झाडू दान करा. माता लक्ष्मी तुमच्यावर कृपा करेल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?