Vastu Shastra : स्वयंपाक करताना या चुका टाळाच, अन्यथा घरात येईल गरिबी
आपण दररोज स्वयंपाक करताना अशा काही छोट्या -छोट्या चुका करतो, ज्यामुळे देवी अन्नपूर्णा माता अप्रसन्न होते. या चुका टाळल्या पाहिजेत. आज आपण अशाच काही गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या चुका स्वयंपाक करताना अनेकदा होतात.

हिंदू धर्मामध्ये स्वयंपाक घराला सर्वात पवित्र स्थान मानलं जातं. कारण स्वयंपाक घर हे ऊर्जेचं सर्वात मोठं केंद्र असतं. आपण जे काही खातो, त्यातून आपल्याला ऊर्जा प्राप्त होते. त्यामुळे वास्तुशास्त्रामध्ये स्वयंपाक घराला विशेष महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार आपण स्वयंपाक करताना काही छोट्या-छोट्या चुका करतो. मात्र या चुका आपल्याला खूप महागात पडतात. यामुळे तुमच्या घरात सतत नकारात्मक ऊर्जेची निर्मिती होते. या ऊर्जेमुळे तुमच्या दैनंदिन आयुष्यात अडचणी निर्माण होतात. तुमचं मोठं नुकसान देखील होऊ शकतं. त्यामुळे स्वयंपाक करताना काय काळजी घेतली पाहिजे? तुमचं स्वयंपाक घर कसं असावं? याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत, चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रामध्ये नेमकं काय सांगण्यात आलं आहे? त्याबद्दल.
कणीक – भाकरी किंवा चपात्यासाठी मळलेल्या पिठाला कणीक असं म्हटलं जातं. कधीही स्वयंपाक करताना आपल्याला हवी तेवढीच कणीक मळावी, गरजेपेक्षा अधिक कणीक मळू नये, तसेच उरलेली कणीक ही कधीही फ्रिजमध्ये ठेवण्याची चूक करू नये. जर तुम्हाला कणीक फ्रीजमध्ये ठेवायचीच असेल तर तिचे पूर्णपणे गोल गोळे कधीच करू नयेत, अशा प्रकारचे पूर्ण गोळ गोळे हे पिंडाचं प्रतिक मानलं जातं, यामुळे घरात पितृदोष निर्माण होतो. त्यामुळे कणकेला कधीही गोल आकार देऊ नये.
ही भांडी उलटी ठेवू नका – काही भांडी ही अशी असतात, जी स्वंयपाक घरात कधीही उलटी ठेवू नये, त्यामध्ये कढई कधीही उलटी ठेवू नये, कारण कढईला राहुचं प्रतिक मानलं जातं. जर तुम्ही स्वयंपाक घरात कढई उलटी ठेवली तर त्यामुळे घरात राहुदोष निर्माण होतो. त्याचप्रमाणे घरात कधीही धारदार वस्तू देखील उटलट्या ठेवू नये, असंही वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. अशा छोट्या-छोट्या चुका टाळल्यास घरात सदैव सकारात्मक ऊर्जा राहते.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)