Vastu Shastra : घरात हे तीन फोटो लावले असतील तर आजच काढा, वाढेल मानसिक तणाव, वास्तुशास्त्र काय सांगतं?

हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्र महत्त्वाचं माण्यात आलं आहे. वास्तुशास्त्रानुसार काही फोटो हे अशुभ असतात, ज्याचा नकारात्मक प्रभाव तुमच्यावर होतो. असे फोटो चुकूनही घरात लावू नयेत, तसेच ते जर तुमच्या घरात असतील तर त्यांना काढून टाकावे, चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रामध्ये नेमकं काय सांगण्यात आलं आहे? त्याबद्दल.

Vastu Shastra : घरात हे तीन फोटो लावले असतील तर आजच काढा, वाढेल मानसिक तणाव, वास्तुशास्त्र काय सांगतं?
Vastu Shastra
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 24, 2026 | 10:12 PM

हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्राला महत्त्वाचं माण्यात आलं आहे, वास्तुशास्त्रामध्ये केवळ तुमचं घर कसं असावं? त्याची रचना कशी असावी? घराचा मुख्य दरवाजा कोणत्या दिशेला असावा? स्वयंपाक घर कोणत्या दिशेला असावं? एवढीच माहिती सांगण्यात आलेली नाहीये. वास्तुशास्त्रानुसार तुम्ही तुमच्या घरात ज्या -ज्या वस्तू ठेवतात त्या प्रत्येक वस्तुची दिशा ही ठरलेली असते, जर तुम्ही त्या -त्या दिशेला ती वस्तू ठेवली तर त्याचं शुभ फळ तुम्हाला मिळतं, परंतु तुम्ही जर चुकीच्या दिशेला चुकीची वस्तू ठेवली तर तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढू शकते, यालाच वास्तुदोष असं म्हटलं जातं. अशा प्रकारचे नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी देखील वास्तुशास्त्रामध्ये काही उपाय सांगण्यात आले आहेत. वास्तुशास्त्रानुसार असे काही फोटो असतात, जे घरात असणं अशुभ मानलं जातं, त्याचा नकारात्मक प्रभाव तुमच्या कुटुंबावर आणि तुमच्यावर होऊ शकतो, चला तर आज आपण अशाच काही फोटोंबद्दल वास्तुशास्त्रामध्ये नेमकं काय सांगण्यात आले आहे, त्याबद्दल जाणून घेणार आहोत.

युद्धाचे प्रसंग असलेले फोटो – वास्तुशास्त्रानुसार घरात कधीही युद्धाचे प्रसंग असलेले फोटो असू नयेत, यामुळे घरात एक विशिष्ट प्रकारची नकारात्मक ऊर्जा तयार होते. काहीही कारण नसताना भांडणं होतात. कुटुंबातील सदस्यांचं एकमेकांसोबत पटत नाही. तसेच पती-पत्नीच्या नात्यामध्ये देखील दुरावा निर्माण होतो, मानसिक तणाव वाढतो, त्यामुळे घरात कधीही युद्धाचे प्रसंग असलेले फोटो असू नयेत, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

Loading...

हिंस्र प्राण्यांचे फोटो – वास्तुशास्त्रानुसार घरात कधीही हिंस्र प्राण्याचे फोटो असू नयेत, यामुळे मानसिक तणाव वाढतो. घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते. ज्याचा अशुभ प्रभाव हा तुमच्या संपूर्ण कुटुंबावर पडू शकतो. एवढंच नाही तर घरात गृहकलह देखील वाढतो, त्यामुळे घरात कधीही हिंस्र प्राण्यांचे फोटो असू नयेत, असा सल्ला वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे.

काटेरी वनस्पतींची फोटो – दरम्यान घरामध्ये काटेरी वनस्पतींचे फोटो देखील असू नये, असं देखील वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us