
वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमच्या दैनंदिन जीवनात ज्या समस्या निर्माण होतात, त्यावर उपाय सांगण्यात आले आहेत, जसं की अचानक तुम्हाला सर्व सुरळीत सुरू असताना आर्थिक अडचणी येऊ लागतात. तुमच्या घरात भरपूर प्रमाणात पैसा येतो. मात्र तो हातात टिकत नाही. पत्नी-पत्नीमध्ये सर्व सुरळीत सुरू असतं, मात्र अचानक वाद वाढू लागतात. सततच्या भांडणांमुळे घरात वातावरण अशांत बनतं. आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. असं का होतं? तर त्यासाठी तुमच्या काही छोट्या -छोट्या चुका कारणीभूत असतात. अशा चुकांमुळे तुम्हाला आर्थिक, आरोग्य आणि इतर अडचणींचा सामना करावा लागतो. या चुका कोणत्या आणि त्याचे परिणाम काय होऊ शकतात? तसेच त्यावर काय उपाय असू शकतात? याचं मार्गदर्शन वास्तुशास्त्रामध्ये करण्यात आलं आहे. हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला खूप महत्त्व आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी आजही आपल्याला घराची रचना ही वास्तुशास्त्राप्रमाणेच केलेली दिसते.
वास्तुशास्त्रानुसार अशी काही झाडं असतात, वस्तू असतात किंवा मूर्ती असतात. त्या घरात असता कामा नये. यामुळे घरात सतत नकारात्मक ऊर्जा उत्सर्जित होत असते, ज्याचा परिणाम हा फक्त तुमच्या एकट्यावरच होत नाही, तर तुमच्या संपूर्ण कुटुंबावर होतो. जसं की व्यवसाय किंवा नोकरी सुरळीत सुरू असते, मात्र मध्येच काही अडचणी निर्माण होतात. व्यवसायात आर्थिक फटका बसतो. किंवा कुटुंबातील एखादा व्यक्ती अचानक आजारी पडतो, काहीही कारण नसताना घरात गृहकलह वाढतो, अशी काही लक्षणं या नकारात्मक ऊर्जेची असू शकतात. त्यामुळे हा धोका वेळीच ओळखून अशा वस्तू घरातून हलवल्या पाहिजेत, असा सल्ला वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे. प्रमुख्यानं घरात काटेरी झुडपं किंवा झाडं असू नये असं वास्तुशास्त्र सांगतं.
वास्तुशास्त्रानुसार घरात कधीही नटराजची मूर्ती असू नये, नटराज हे भगवान महादेव यांचंच एक रूप आहे. मात्र ते तांडव करताना यामध्ये दाखवलं आहे, त्यामुळे ही मूर्ती कधीही घरात असू नये, यामुळे घरात वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात. जसं की घरात भांडणाला सुरुवात होते, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. वास्तुशास्त्रानुसार घरात नेहमी शिवलिंग असावं. तुमच्या देवघरात शिवलिंग ठेवावं, दररोज त्याची पूजा करावी, महादेवाची मनोभावे प्रार्थना करावी. त्यामुळे सदैव तुमच्यावर महादेवांची कृपा राहते.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)