Vastu Shastra : ही चूक कधीच करू नका, मिळेल गृहकलहाला आमंत्रण, घरात सतत होतील भांडणं
वास्तुशास्त्रानुसार जेव्हा घरात वास्तुदोष निर्माण होतो, तेव्हा त्याचे परिणाम तुम्हाला वेगवेगळ्या स्वरुपात दिसू लागतात. जसं की घरामध्ये अचानक आर्थिक अडचणी निर्माण होतात. काहीही कारण नसताना कुटुंबात भांडणं होतात. यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, त्यातीलच एका उपायाबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

वास्तुशास्त्रानुसार घरात जेव्हा वास्तुदोष निर्माण होतो, तेव्हा तुमच्या आयुष्यात विविध प्रकारच्या अडचणी निर्माण होऊ शकतात. जसं की अचानक एखादं मोठं आर्थिक संकट येऊ शकतं. तुम्ही पैसा कितीही कमावला तरी तो हातात टिकत नाही.कोणत्या न कोणत्या कारणांमुळे तो खर्च होतो. घरात काहीही कारण नसते, परंतु तरी देखील कुटुंबातील सदस्यांचे एकमेकांसोबत भांडणं होतात. पती-पत्नीचं पटत नाही. मुंलांचं अभ्यासात लक्ष लागत नाही. अशा घटना तुमच्यासोबत घडू शकतात. त्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये विविध उपाय सांगण्यात आले आहेत, त्यातीलच एका उपायाबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. जर घरात कोणतंही कारण नसताना सतत भांडणं होत असतील, तर त्यासाठी हा उपाय महत्त्वाचा ठरू शकतो.
घरात वास्तुदोष का निर्माण होतो?
जेव्हा तुमच्या घराची रचना ही वास्तुशास्त्रानुसार नसते, तेव्हा तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. तसेच तुमच्या घरात जेवढ्या काही वस्तू आहेत, त्या सर्व वस्तू कुठे ठेवाव्यात? याची वास्तुशास्त्रानुसार एक निश्चित दिशा असते. जर या वस्तू चुकीच्या दिशेला ठेवल्या गेल्या तरी देखील घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. त्याचप्रमाणे आपण आपल्या आयुष्यात अशा काही छोट्या -मोठ्या चुका करतो, ज्यामुळे आपल्या नकळत घरात वास्तुदोष निर्माण होतो. थोडक्यात काय तर घरात जेव्हा सकारात्मक ऊर्जेचं प्रमाण कमी होऊन नकारात्मक ऊर्जा वाढते त्यालाच सोप्या भाषेमध्ये वास्तुदोष निर्माण झाला असं म्हटलं जातं. त्या नकारात्मक ऊर्जेचा परिणाम हा तुमच्यावर होत असतो. असं होऊ नये म्हणून वास्तुशास्त्रामध्ये काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत.
घरात सारखी भांडणं होत असतील तर काय करायचं?
वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या घरात कोणंतही कारण नसताना सतत भांडणं होत असतील तर याचा अर्थ तुमच्या घरात वास्तुदोष असू शकतो. त्यासाठी सर्वात आधी तुम्ही तुमच्या घरातील कचरा कुठे टाकता हे पहाणं महत्त्वाच आहे. वास्तुशास्त्रानुसार घरात कधीही कचरा साठवून ठेवू नये, त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे घरातील कचरा हा वेळोवेळी घरातून बाहेर काढावा, तसेच घरातील कचरा टाकण्याची डझबीन नेहमी दक्षिण पश्चिम दिशेला ठेवावी. घर नेहमी स्वच्छ ठेवावं, यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही आणि घर नेहमी शांत राहतं.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)