
वास्तुशास्त्रानुसार असे काही झाडं असतात, ज्या झाडांमुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, अशी झाडं जर घरात लावली तर त्यामुळे काहीही कारण नसताना घरातील वातावरण अशांत बनतं, गृहकलह निर्माण होतो. अचानक एखादं मोठं आर्थिक संकट तुमच्यावर येऊ शकतं. त्यामुळे अशी झाडं घरात न लावण्याचा सल्ला वास्तुशास्त्रात देण्यात आला आहे. ज्यामध्ये प्रामुख्यानं काटेरी झाडांचा समावेश होतो, याला देखील काही काटेरी झाडं ही अपवाद असतात. तर काही झाडं ही अतिशय पवित्र असतात, अशा झाडांना घरात लावणं हे खूप शुभ मानलं जातं. वास्तुशास्त्रानुसार अशी झाडं तुम्ही जेव्हा घरात लावता तेव्हा तुमची भरभराट होते. घरातील वातावरण आनंदी राहतं. असचं एक झाडं आहे ते म्हणजे शमीचं. हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या झाडाला सर्वात पवित्र मानलं गेलं आहे. तुळशीनंतर शमीच्याच झाडाचं महत्त्व आहे. त्यामुळे आज आपण शमीचं झाडं लावताना काय काळजी घ्यावी? कोणत्या चुका करू नयेत? याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
वास्तुशास्त्रानुसार शमीचं झाडं हे शनि देव आणि भगवान हनुमान यांचं अत्यंत प्रिय झाड आहे. ज्या घरात शमीचं झाडं असेल तिथे कधीही शनिदोष निर्माण होत नाही, शनि देव आणि भगवान हनुमान यांचा आशीर्वाद सदैव आपल्यावर राहतो. मात्र शमीचं झाड लावताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं, जर आपण या चुका केल्या तर तुमच्या घरात शनिदोष निर्माण होऊ शकतो. शनिदेव नाराज होऊ शकतात. शनिदेव नाराज झाल्यास घरात नेहमी भांडणं होतात.
काय कळाजी घ्यावी?
घरात जेव्हा तुम्ही शमीचं झाडं लावता, तेव्हा नेहमी या झाडाच्या परिसरात स्वच्छता ठेवा. या झाडाजवळ कचरा निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. तसेच जिथे शमीचं झाडं आहे, तिथे कधीही चप्पल, बूट ठेवू नका. या झाडाला नियमीत जल अर्पण करा ते सुखणार नाही याची काळजी घ्या. वास्तुशास्त्रानुसार त्यामुळे तुमच्यावर सदैव भगवान शनि आणि हनुमान यांची कृपा राहील. तुमची भरभराट होईल. तसेच शमीचं रोप लावताना आणखी एक महत्त्वची काळजी घ्या, ती म्हणजे शमीचं रोप हे कधीही तुळशीच्या रोपाजवळ लावू नका, त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो, असं वास्तुशास्त्र सांगतं.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)