Vastu Shastra : घरात बेलाचे झाड लावावे की लावू नये? पाहा वास्तुशास्त्र काय सांगतं?

वास्तुशास्त्रामध्ये काही झाडांना हे अत्यंत पवित्र माण्यात आलं आहे, तर काही झाडांना घरात लावणं अशुभ माण्यात आलं आहे. आज आपण बेलाच्या झाडाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात बेलाचं झाड घरात लावावं की लावू नये?

Vastu Shastra : घरात बेलाचे झाड लावावे की लावू नये? पाहा वास्तुशास्त्र काय सांगतं?
vastushtra
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 20, 2026 | 8:26 PM

वास्तुशास्त्रामध्ये काही झाडांना अत्यंत शुभ माण्यात आलं आहे. अशी झाडं तुम्ही तुमच्या घरात किंवा घराच्या परिसरात लावली तर त्यामुळे सर्व प्रकारच्या नकारात्मक शक्तीचा नाश होतो. घरात सदैव सकारात्मक ऊर्जा राहते. यामुळे ऊर्जा संतुलन साधलं जातं. तुमच्या घरातील सर्व समस्या दूर होतात, असं मानलं जातं. परंतु काही झाडं हे अशी देखील असतात, की जी झाडं घरात न लावण्याचा सल्ला दिला जातो. कारण अशा झाडांमुळे सतत नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते, जिचा त्रास तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला होतो. तुमच्या महत्त्वाच्या कामांमध्ये अडथळा निर्माण होतो. तर काही झाडं अशी देखील असतात, जी अत्यंत पवित्र असतात, परंतु वास्तुशास्त्रामध्ये अशी झाडं घराच्या अंगणात लावू नये, असा सल्ला देण्यात आला आहे. आज आपण बेलाच्या झाडाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत? चला तर मग पाहूयात घराच्या अंगणात बेलाचं झाडं लावणं शुभ की अशुभ? याबद्दल वास्तुशास्त्रामध्ये नेमकं काय सांगण्यात आलं आहे? त्याबद्दल.

घरात बेलाचं झाडं लावणं हे वास्तुशास्त्रामध्ये अत्यंत शुभ माण्यात आलं आहे. कारण त्याचे अनेक फायदे आहेत. बेलाचं झाड हे भगवान महादेव यांना अत्यंत प्रिय आहे. बेलाची पानं महादेवांना अत्यंत प्रिय आहेत. वास्तुशास्त्रानुसार दररोज महादेवांना बेलाची पानं अर्पण केली पाहिजेत, यामुळे महादेवांची कृपा सदैव आपल्यावर राहते, महादेवांच्या आशीर्वादाने आपल्यावरील सर्व संकटं दूर होतात. एवढंच नाही तर बेलाच्या झाडामध्ये परिसरातील सर्व प्रकारची नकारात्मक शक्ती नष्ट करण्याची ताकद असते, त्यामुळे घराच्या परिसरात बेलाचं झाडं लावावं असा सल्ला वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे.

Loading...

घरात बेलाचं झाडं लावताना फक्त एकच काळजी घ्यावी, ते म्हणजे तुमच्या घराच्या एकदम समोर नसावं, म्हणजे मुख्य दरवाजासमोर कोणताही अडथळा होऊ नये, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. तसेच बेलाचे अनेक औषधी गुणधर्म देखील आहेत. बेलाच्या झाडापासून मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देखील मिळतो.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us