Vastu Shastra : पितृदोषामुळे त्रस्त आहात? मग पाण्याने भरलेल्या माठाजवळ ठेवा ही एक छोटी वस्तू, घरात येईल पैसाच पैसा

अनेकांच्या कुंडलीमध्ये पितृदोष असतो, ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये पितृदोष असतो, त्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यात अनेक अडचणींचा समाना करावा लागतो. वास्तुशास्त्रामध्ये पितृदोष दूर करण्याचे अनेक उपाय सांगितले आहेत, त्यातीलच एका सोप्या परंतु प्रभावी उपायाबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

Vastu Shastra : पितृदोषामुळे त्रस्त आहात? मग पाण्याने भरलेल्या माठाजवळ ठेवा ही एक छोटी वस्तू, घरात येईल पैसाच पैसा
वास्तुशास्त्र
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 03, 2026 | 8:27 PM

वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुमच्या कुंडलीमध्ये पितृदोष असतो, तेव्हा तुम्हाला तुमच्या आयुष्यात अनेक अडचणी येतात. तुम्ही करत असलेल्या कामांमध्ये अडथळे निर्माण होतात. घरात काहीही कारण नसताना सतत भांडणं होत राहतात, अचानक आर्थिक समस्या येण्यास सुरुवात होतात. हे सर्व तुमच्यासोबत घडतं कारण तुमच्या मृत पूर्वजांना शांती मिळालेली नसते, त्यामुळे त्याचा त्रास तुम्हाला देखील होतो, असं हिंदू धर्मशास्त्रांमध्ये म्हटलं आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या पूर्वजांना तर्पण देत नाहीत, त्यांचे श्राद्ध किंवा पक्ष करत नाहीत, तसेच एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे उत्तर कार्य शास्त्रविधीनुसार पार पडले नसेल तर घरात पितृदोष निर्माण होतो असं मानलं जातं. पितृदोषामुळे तुमच्या आयुष्यात अनेक समस्या येतात, पितृदोष दूर करण्यासाठी वस्तुशास्त्र तसेच हिंदू धर्मशास्त्रामध्ये अनेक उपाय सांगण्यात आले आहेत, त्यातीलच एका उपायाबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. हा अत्यंत सोपा परंतु प्रभावी उपाय असून, यामुळे तुमच्या घरातील पितृदोष दूर होण्यास मदत होते, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

उन्हाळ्याचे दिवस आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपण पाणी थंड राहावं म्हणून ते मातीच्या माठात भरून ठेवतो. माठातील पाणी हे थंड तर असतंच परंतु शरीराला देखील आरोग्यदायी असतं. तुम्हाला फक्त आता एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे तुमच्या घरात जिथे पाण्याने माठ भरून ठेवला आहे, त्याच्या समोर न चुकता दररोज एक दिवा लावायचा आहे. मात्र इथे एक गोष्ट लक्षा ठेवावी की हा दिवा मातीपासून बनवलेला हवा, म्हणजे तुम्ही माठाच्या समोर पणती देखील लावू शकतात. यामुळे तुमच्या घरातील पितृदोष हळुहळु कमी होऊन त्याचा अपेक्षित परिणाम तुम्हाला जाणवू लागेल. पितृदोष जसाजसा कमी होईल तस तशी तुमची आर्थिक प्रगती होते, तसेच घरातील गृह कलह देखील कमी होतो, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

तसेच पितृदोष नष्ट करण्यासाठी वास्तुशास्त्रात आणखी एक प्रभावी उपाय सांगण्यात आला आहे. तो म्हणजे जर तुमच्या घरा शेजारी जिथे पिंपळाचं झाडं असेल तिथे जाऊन पिंपळाला प्रदक्षिणा माराव्यात 11 पासून ते 108 पर्यंत तुम्ही तुमच्या सोईनुसार पिंपळाला कितीही प्रदक्षिणा मारू शकतात. काही दिवस दररोज हा उपाय करावा, यामुळे घरातील पितृदोष नष्ट होतो. तसेच ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे, त्या व्यक्तीने न चुकता पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा, यामुळे देखील पूर्वजांना शांती मिळते आणि पितृदोष दूर होतो, अंस वा्सुशस्त्रात सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us