
हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला खूप महत्व आहे. घरातील प्रत्येक भागासाठी वेगवेगळे नियम आहेत. जर तुमचे घर बांधताना चूक झाली किंवा घरातील वस्तू चुकीच्या जागी ठेवल्या तर घरातील व्यक्तींना त्रासाचा सामना करावा लागू शकतो. मात्र हे टाळण्यासाठी काय केले पाहिजे यासाठी वास्तुशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत. वास्तुशास्त्रातील चुकांमुळे तुमचा घटस्फोटही होऊ शकतो. घटस्फोट टाळण्यासाठी बेडरूममध्ये काही बदल करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
वास्तुशास्त्रानुसार तुमच्या बेडरूममध्ये रेफ्रिजरेटर, इन्व्हर्टर किंवा गॅस सिलेंडर ठेवला असेल तर वास्तुनुसार हे चुकीचे मानले जाते. यामुळे झोपेत व्यत्यय येतो आणि चिडचिडेपणा वाढतो. यामुळे तुमच्या नातेसंबंधांवरही परिणाम होऊ शकतो. हे प्रकरण घटस्फोटापर्यंत जाऊ शकते.
बेडरूमच्या दरवाजाची दिशाही नातेसंबंधांवर परिणाम करते. बेडरूमचा दरवाजा ईशान्य दिशेला असणे वाईट आहे. यामुळे पती-पत्नीमधील नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो. वास्तुनुसार, अशा बेडरूममध्ये राहणारे पती-पत्नी कधीही कोणत्याही गोष्टीवर सहमत नसतात. त्यामुळे नाते तुटू शकते.
बेडरूममध्ये प्रवेश करताना दरवाजा उघडताना किंवा बंद करताना आवाज झाल्यास वास्तुनुसार हे अशुभ आहे. यामुळे जीवनात कलह निर्माण होतो. दरवाजाच्या आवाजाप्रमाणेच नात्यातही कलह निर्माण होतो.
वास्तु बेडरूममध्ये काटेरी झाडे ठेऊ नये. तसेच बिघडलेला पंखा किंवा एअर कंडिशनर देखील त्वरित दुरुस्त करावा. याचा नातेसंबंधांवरही परिणाम होऊ शकतो. तुमच्या बेडच्या अग्नि कोनात पाण्याची बाटली ठेऊ नका. यामुळे झोपेत व्यत्यय येऊ शकतो आणि नातेसंबंधांवर त्याचा परिणाम होऊ शकतो.
वास्तूशास्त्र हे एक प्राचीन भारतीय विज्ञान आहे, जे दिशा, भूमिती, निसर्गाचे पंचमहाभूते (पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश) आणि ऊर्जा यांच्या समन्वयावर आधारित आहे. हे शास्त्र घर, कार्यालय किंवा इतर कोणत्याही इमारतीची मांडणी आणि बांधकाम कसे असावे, यासाठी मार्गदर्शन करते. योग्य दिशेनुसार बांधकाम केल्यास, त्या जागेत सकारात्मक ऊर्जा, आरोग्य, समृद्धी आणि शांतता टिकून राहते, असे मानले जाते. थोडक्यात, हे निसर्गाच्या नियमांनुसार राहण्याची योग्य पद्धत शिकवणारे शास्त्र आहे.