Vastu Tips : घरात पैसा का टिकत नाही? वास्तुशास्त्रानुसार असू शकतात ही 4 कारणं
खूप कष्ट करून देखील आपल्या हातात पैसा टिकत नाही, त्यासाठी अनेकदा तुमच्या कुंडलीमधील दोष देखील कारणीभूत असतात, आज आपण अशा चार कारणांची माहिती घेणार आहोत, ज्यामुळे खर्चामध्ये वाढ होऊन, हातात पैसा टिकत नाही.

वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये जर कोणत्याही कारणांमुळे तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण झाला असेल त्यावर विविध उपाय सांगितले जातात, घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. अनेकदा असं होतं की आपण खूप पैसा कमावतो, मात्र बरकत येत नाही. हातात पैसा टिकत नाही. पैशांची बचत न होण्याची अनेक कारणं असू शकतात, मात्र वास्तुशास्त्रामध्ये अशी काही कारणं सांगण्यात आली आहेत, ज्यामुळे तुम्हाला कायम आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आज अशाच काही कारणांबद्दल माहिती घेणार आहोत, आणि त्यावरील उपाय देखील जाणून घेणार आहोत, ज्यामुळे घरातील वास्तुदोष दूर होऊन घरात बरकत येईल. चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रामध्ये नेमकं काय सांगितलं आहे? त्याबद्दल.
दोषपूर्ण कुंडली – जर तुमच्या कुंडलीमध्ये दोष असेल, राहु, केतू, मंगळ आणि शुक्र यांचं स्थान तुमच्या कुंडलीत दोषपूर्ण असेल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात आर्थिक अडचणी येतात. त्यासाठी या ग्रहांची शांती करण्याचा सल्ला ज्योतिषशास्त्रामध्ये देण्यात आला आहे.
घराची उत्तर आणि ईशान्य दिशा – जर तुमच्या घराची उत्तर आणि ईशान्य दिशा ही स्वच्छ नसेल, नियमित स्वच्छता राखली जात नसेल तरी देखील तुम्हाला पैशांची अडचण येऊ शकते, कारण उत्तर ही कुबेराची आवडती दिशा आहे, तर ईशान्य दिशा ही देवी देवतांची आवडती दिशा आहे. त्यामुळे या दोन्ही दिशा नेहमी मोकळ्या आणि हवेशीर आणि स्वच्छ असाव्यात. उत्तर दिशेला तुम्ही कुबेराचा फोटो देखील लावू शकता.
लक्ष्मीची मातेची पूजा न करणं – वास्तुशास्त्रानुसार लक्ष्मी माता ही धनाची देवता आहे, त्यामुळे घरात नियमितपणे लक्ष्मी मातेची पूजा केली गेली पाहिजे, घरामध्ये लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा प्रतिमा असावी.
अनावश्यक खर्च – अनेकदा असं होतं की आपलं खर्चावर नियंत्रण राहत नाही. अनेकदा काही गोष्टींची गरज नसताना देखील त्या आपण खरेदी करतो, अशा परिस्थितीमध्ये आपला मोठा खर्च होतो. हे देखील पैसा हातात न टिकण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेले आहेत. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही. तसेच आमचा अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
