AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastushastra : देवघरात शनी देवांची मूर्ती किंवा फोटो का ठेवला जात नाही? जाणून घ्या कारण

शनी देवांना न्यायाची देवता म्हटलं जातं. शनी देव हे कर्मफळ दाता आहेत. मात्र तरी देखील शनी देवाचा फोटो किंवा मूर्ती देवघरात का ठेवली जात नाही? याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? आज आपण त्याचं कारण जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात वस्तुशास्त्र काय सांगतं?

Vastushastra : देवघरात शनी देवांची मूर्ती किंवा फोटो का ठेवला जात नाही? जाणून घ्या कारण
shani devImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 10, 2026 | 9:29 PM
Share

शनी देवांना न्यायाची देवता म्हटलं जातं. तसेच शनी देवांना कर्मफळ दाता असं देखील म्हटलं जातं. हिंदू धर्मशास्त्रानुसार शनी देव प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतात. जेव्हा एखाद्या व्यक्तीला शनीची साडेसाती असते, तेव्हा त्याच्या आयुष्यात अनेक अडचणी निर्माण होतात. हा त्या व्यक्तीसाठी कसोटीचा काळ असतो. त्यामुळे शनीची साडेसाती कमी करण्यासाठी हिंदू धर्माशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. मात्र जेव्हा शनी देव एखाद्या व्यक्तीवर प्रसन्न होतात, तेव्हा त्या व्यक्तीला ते भरभरू देतात. अशा व्यक्तीला शनी देवाच्या कृपेनं प्रगतीच्या अनेक संधी उपलब्ध होतात. मात्र तुम्हाला हे माहीत आहे का? शनी देवांना न्यायाची देवता म्हटलं जातं, शनी देव हे कर्मफळ दाता आहेत. तरीही त्यांची मूर्ती किंवा फोटो हा देवघरात का ठेवला जात नाही? चला तर मग आपण या मागचं कारण जाणून घेऊयात.

शनी देव यांची वक्रदृष्टी असते, जेव्हा शनी देवाची वक्र दृष्टी एखाद्या व्यक्तीवर पडते, तेव्हा त्याच्या आयुष्यात अनेक संकट येण्यास सुरुवात होतात. त्याच्यामागे साडेसाती सुरू होते. त्यामुळे शनी मंदिरात जरी आपण गेलो तरी देखील शनी देवाचं थेट समोरून दर्शन घेतलं जात नाही. शनी देवाच्या बाजुने शनी देवांचं दर्शन घेतलं जातं, हेच कारण आहे की, देवघरामध्ये कधीही शनी देवांचा फोटो किंवा मूर्ती ठेवली जात नाही.

शनीदोष दूर करण्यासाठी उपाय 

जर तुम्हालाही शनी दोष असेल तर शनीदोष दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये विविध उपाय सांगण्यात आले आहेत. ज्या व्यक्तीला शनी दोष आहे, अशा व्यक्तीने दर शनिवारी शनी मंदिरात जाऊन शनी महाराजांची पूजा करावी, त्यांना काळे तीळ आणि मोहरीचं तेल अर्पण करावं. तसेच आपल्या ताकदीप्रमाणे गरजू लोकांना दान करावं यामुळे शनी महाराज प्रसन्न होतात आणि शनी दोष दूर होतो, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत