AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई लोकल तरुण हत्या प्रकरणात महत्वाची अपडेट; मयंकच्या कुटुंबियांचा आक्रोश, सरकारकडे केली कारवाईची मोठी मागणी

Mumbai local murder update : मुंबई लोकलमध्ये मयंकच्या हत्या झाल्याने त्यांच्या कुटुंबाला मोठा हादरा बसला आहे. त्याच्या हत्येनंतर कुटुंबियांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे.

मुंबई लोकल तरुण हत्या प्रकरणात महत्वाची अपडेट; मयंकच्या कुटुंबियांचा आक्रोश, सरकारकडे केली कारवाईची मोठी मागणी
| Updated on: Jun 25, 2026 | 8:21 AM
Share

मुंबई लोकलमधील गर्दी, वाढत्या गुन्ह्यांचा प्रश्न एकदा ऐरणीवर आला आहे. लोकल ट्रेनमध्ये मागील 6 महिन्यांत दुसर्‍यांदा हत्येचा थरार घडला आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल ट्रेनमध्ये 22 वर्षीय मयंक लोहारच्या हत्येने सर्वत्र खळबळ माजली आहे. प्रकरणी पोलिसांनी 24 तासांत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. मयंकच्या हत्येनेतर त्यांच्या कुटुंबियांनी आरोपीला फाशीची कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

पश्चिम रेल्वेवर मंगळवारी रात्री 10.50 वाजता चर्चगेट-नालासोपारा फास्ट लोक ट्रेनमध्ये रक्तरंजित थरार घडला. ट्रेन ही अंधेरी आणि बोरिवली स्टेशनदरम्यान धावत असताना फर्स्ट क्लास डब्यात हा धक्कादायक प्रकार घडला. ट्रेनच्या डब्यात पावसाचं पाणी येत होते, त्यामुळे लोकलचा दरवाजा बंद करण्यावरून वाद झाला. या किरकोळ वादानंतर आरोपी रोशन सुवर्णाने बॅगेतील चाकू काढत मयंकच्या छाती आणि पोटावर सपासप वार केले. या जीवघेण्या हल्ल्यात मयांक गंभीर जखमी झाला. तर पुढील काही क्षणात आरोपी रोशन धावत्या ट्रेनमधून उडी मारून फरार झाला.

ट्रेन बोरिवली स्टेशनला पोहोचल्यानंतर रेल्वेचे अधिकारी, जीआरपी आणि आरपीएफ संबंधित डब्यात पोहोचले. मयंकला तातडीने मेडिकल रुममध्ये दाखल केले. त्यानंतर जवळील रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी मयंकला मृत घोषित केले. लोकल ट्रेनमधील हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या हत्येच्या घटनेनंतर अनेकांकडून प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी ७ विशेष पथकांची स्थापना केली होती. आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी बोरिवली, अंधेरी, मीरा रोड आणि नालासोपारा स्टेशनवरील ४०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. आरोपी रोशन सुवर्णा हा मीरा रोडच्या पूर्व भागात वास्तव्यास होता. त्याला बुधवारी पनवेलमधून अटक करण्यात आली. मयंकच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे. मयंकची बहिणीने कारवाईची मागणी करताना म्हटलं की, आमच्या कुटुंबाचं सर्वस्व हिरावलं असून आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी’.

Follow Us
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट
Parbhani : पहाटे 4 वाजता उठायचं, 2.5 किमी... हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट, Video व्हायरल
स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज... शायना एन.सी. यांचा राऊतांवर पलटवार
Shaina NC : स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज म्हणत... शायना एन.सी. यांचा संजय राऊतांवर पलटवार
Pune : लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
Video: पुण्यात 28 तासांपासून तुफान गर्दी, डान्स अन् गाणं सुरूच...लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला...
Jalna : आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह